भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी मागील ९ महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. त्यामुळे तो निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. परंतु भारतीय संघात धोनीची जागा घेणारा दुसरा यष्टीरक्षक कोण असणार यासाठी एका खेळाडूचे नाव समाेर आले आहे. हा खेळाडू इतर कोणी नसून भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल हा आहे.
आज राहुल आपला २८ वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म १८ एप्रिल, १९९२ मध्ये कर्नाटकच्या बंगळुरु येथे झाला.
त्याने आतापर्यंत ३६ कसोटी सामने, ३२ वनडे सामने आणि ४२ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने कसोटीत २००६ धावा केल्या आहेत. त्यात ५ शकते आणि ११ अर्धशतके केली आहेत. त्याचबरोबर त्याने वनडेत १२३९ आणि टी२०त १४६१ धावा केल्या आहेत.
राहुलने भारतासाठी आता सामना फिनिश करण्याची जबाबदारी स्विकारली आहे. इतकेच नव्हे तर ग्लोव्ह्ज घालून यष्टीमागील जबाबदारीदेखील सांभाळण्यास सुरुवात केली आहे. ज्याप्रकारे धोनीने कामगिरी केली होती अगदी त्याचप्रकारे यष्टीरक्षक फलंदाज (Wicket Keeper Batsman) म्हणून राहुलनेही चांगली कामगिरी केली आहे. तरीही त्याचा उत्तराधिकारी म्हणून रिषभ पंतने (Rishabh Pant) संघात प्रवेश मिळविला होता. परंतु त्याला स्वत:ला सिद्ध करता आले नाही.
राहुलने (KL Rahul) २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यातून आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. याच सामन्यानंतर धोनीने (MS Dhoni) कसोटीतून निवृत्ती घेतली होती. त्यामुळे असे म्हटले जाऊ शकते की, ज्या कसोटी सामन्यातून धोनीची कसोटी कारकीर्द संपली त्याच कसोटी सामन्यातून राहुलने आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली.
यानंतर २ वर्षांनी राहुलने भारतीय संघाच्या वनडे आणि टी२० संघामध्येही स्थान मिळविले. परंतु २०१८मध्ये त्याला संघातून बाहेर पडावे लागले होते.
राहुल हा जगातील एकमेक फलंदाज आहे ज्याने केवळ कसोटी सामन्यातच नव्हे तर वनडे पदार्पणाच्या सामन्यातही सलामीवीर म्हणून शतक ठोकले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात तो सुरुवातीला मधळ्या फळीत चांगली कामगिरी करण्यात अयशस्वी झाला. परंतु दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळताना त्याने सलामीला फलंदाजी करत ११० धावांची शतकी खेळी केली होती.
तसेच २०१६मध्ये झिंबाब्वेविरुद्धच्या वनडे सामन्यातून पदार्पण करताना राहुलने शतकी खेळी केली होती. याव्यतिरिक्त तो भारतीय संघाचा एकमेव खेळाडू आहे, ज्याने आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या सामन्यातच शतक केले आहे.
यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संघात स्थान मिळविणाऱ्या राहुलने कसोटी, वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये शतक ठोकण्याचा मान मिळविला आहे. त्याच्याव्यतिरिक्त केवळ सुरेश रैना आणि रोहित शर्मा हे असे खेळाडू आहेत, ज्यांनी भारतासाठी तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये शतक केले आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-सलमान खान की एमएस धोनी? केदार जाधवने दिलं हे उत्तर
-मी मुर्ख आहे का? ३०० वनडे सामने खेळून मला काही कळतं नाही का?
-आणि म्हणून शिखऱ धवनने पंजाबी गाणे ऐकणे केले बंद