भारतीय संघाचे सध्याचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आज आपला 61 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या जन्म 27 मे 1962 मध्ये मुंबईत झाला होता.
आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत भारताकडून त्यांनी आतापर्यंत 80 कसोटी सामने आणि 150 वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी कसोटीत 35.79 च्या सरासरीने 3830 धावा केल्या आहेत. त्यात 11 शतके आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच कसोटीत त्यांनी 151 विकेट्स घेतल्या आहेत. याबरोबरच त्यांनी वनडेत 29.04 च्या सरासरीने 3108 धावा केल्या आहेत. त्यात 4 शतके आणि 18 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच वनडेत त्यांनी 129 विकेट्स घेतल्या आहेत.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्याबद्दलच्या खास गोष्टी ज्या खूप कमी चाहत्यांना माहीत आहेत. Happy Birthday Ravi Shastri Career Lesser Known Facts
6. शास्त्री बनले पोस्टर बॉय-
भारतीय संघाचे अष्टपैलू क्रिकेटपटू शास्त्री लवकरच संपूर्ण भारतात नावारुपाला आले. त्यामुळे ते भारताचे ‘पोस्टर बॉय’ बनले होते. त्यांचे पोस्टर संपूर्ण भारतभर लावले जात होते. तसेच मुलीही त्यांच्या कामगिरीमुळे त्यांच्या चाहत्या बनल्या होत्या. शास्त्रींचे सिनेअभिनेत्री अमृता सिंगबरोबर अफेयरदेखील होते. त्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले होते, असे काही रिपोर्ट्स समोर आले होते.
5. शास्त्रींनी ठोकले 6 चेंडूत 6 षटकार-
शास्त्रींनी 1985मध्ये रणजी ट्रॉफीत बडोदा संघाविरुद्ध मुंबई संघाकडून खेळताना तूफान फलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यांनी त्या सामन्यात द्विशतक ठोकले होते. तसेच त्यांनी तिलक राजच्या (Tilak Raj) गोलंदाजीवर 6 चेंडूत 6 षटकार ठोकले होते. असा कारनामा करणारे ते पहिले भारतीय बनले होते. शास्त्रींनी त्या सामन्यात केवळ 123 चेंडूत 200 धावांची द्विशतकी खेळी केली होती. त्यात 13 चौकार आणि 13 षटकारांचा समावेश आहे.
4. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ताबडतोब कामगिरी-
शास्त्रींनी ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध ताबडतोब फलंदाजी केली होती. त्यांनी 9 कसोटी सामन्यात 77.75 च्या सरासरीने तब्बल 622 धावा केल्या होत्या. त्यात 1 अर्धशतक आणि 2 शतकांचा समावेश आहे. याव्यितिरिक्त शास्त्रींनी इंग्लंडविरुद्ध 4 आणि पाकिस्तानविरुद्ध 3 शतक ठोकले होते. तर वेस्ट इंडीजविरुद्धही त्यांनी 2 शतके ठोकली होती.
3. 10व्या क्रमांकावर खेळणारे शास्त्री बनले सलामीवीर फलंदाज-
शास्त्रींनी आपल्या कसोटी कारकीर्दीची सुरुवात १०व्या क्रमांकावरील फलंदाज म्हणून केली होती. परंतु केवळ २ वर्षांच्या आत ते भारतीय संघासाठी कसोटीत सलामीला फलंदाजी करू लागले. शास्त्रींनी कसोटीत सलामीवीर फलंदाज म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांनी 17 कसोटी सामन्यांमध्ये 44.4 च्या सरासरीने 1101 धावा केल्या आहेत. त्यांनी सलामीला फलंदाजी करताना 4 शतके ठोकली. यामध्ये त्यांनी एक द्विशक देखील केले आहे. त्यांनी कसोटीत फक्त एका क्रमांकावर फलंदाजी केलेली नाही.
२. वयाच्या 19व्या वर्षी पदार्पण-
शास्त्रींनी वयाच्या केवळ 17व्या वर्षी मुंबई संघासाठी रणजी ट्रॉफीत पदार्पण केले होते. तसेच ते जेव्हा महाविद्यालयात शिक्षण घेत होते, तेव्हा त्यांना भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली होती. शास्त्रींनी 21 फेब्रुवारी 1981 मध्ये वेलिंग्टन येथे न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्याच कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यांनी दोन डावात प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या होत्या. दुसऱ्या डावातील 3 विकेट्स तर त्यांनी केवळ 4 चेंडूंच्या आत घेतले होते. त्यांच्या गोलंदाजीवर 3 झेल दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) यांनी घेतले होते.
१. रवी शास्त्रींचे पूर्ण नाव-
खरंतर खूप कमी क्रिकेटप्रेमी आहेत ज्यांना रवी शास्त्रींचे पूर्ण नाव माहित आहे. शास्त्रींचे पूर्ण नाव रविशंकर आहे. परंतु ते रवी या नावानेच ओळखले जातात. त्यांना शाझदेखील म्हटले जाते. तसेच त्यांचे संपूर्ण नाव रविशंकर जयद्रिथ शास्त्री (Ravishankar Jayadritha Shastri) असे आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आकाश मधवालचा ‘हिरो ते झिरो’चा प्रवास! गुजरात टायटन्सच्या फलंदाजांकडून धुलाई
सॅमसनने ऐकला नाही गावसकरांचा सल्ला, माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक खुलासा, म्हणाला…