सोमवारी (२६ ऑक्टोबर) बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी कसोटी, वनडे आणि टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. या दौऱ्यात संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्यामुळे त्याला सामील केले नाही, तर रिषभ पंतला केवळ कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे. यासोबतच आयपीएलमधील मुंबई इंडियन संघाचा धडाकेबाज खेळाडू सूर्यकुमार यादवलाही संघात स्थान दिले नाही. त्यामुळे भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगने निवडकर्त्यांच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
हरभजनने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून राग व्यक्त केला. त्याने भारतीय संघाच्या निवडकर्त्यांना सूर्यकुमारची आकडेवारी पाहण्याची विनंती केली. आणि म्हटले की, निवडीच्या वेळी वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळे निकष वापरले जातात.
त्याने ट्वीट केले, “भारतीय संघात निवडीसाठी सूर्यकुमार यादवला आणखी काय करण्याची आवश्यकता आहे, हे मला समजत नाही. तो प्रत्येक आयपीएल आणि रणजी हंगामात चांगली कामगिरी करत आहे. मला वाटते की, वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळे नियम वापरेल जातात. बीसीसीआयच्या सर्व निवडकर्त्यांना विनंती करतो की, सूर्यकुमारची सर्व आकडेवारी पाहा.”
Don’t know what else @surya_14kumar needs to do get picked in the team india.. he has been performing every ipl and Ranji season..different people different rules I guess @BCCI I request all the selectors to see his records
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) October 27, 2020
आयपीएल २०२० मध्ये मुंबई इंडियन्स संघासाठी सूर्यकुमार यादव चांगली कामगिरी करत आहे. त्याने आतापर्यंत ११ सामने खेळले असून त्यात त्याने २८३ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-रोहितने ट्विटर, इंस्टाग्राम बायोमधून काढला ‘इंडियन क्रिकेटर’ टॅग, यामागे नक्की कारण काय?
-“त्याने केलेलं काम नेहमी मनात राहील”, धोनीने ‘त्या’ सुपरफॅनचे मानले आभार
-व्हिडीओ: मॅक्सवेलच्या फिरकीत अडकला नितीश राणा, पहिल्याच षटकात दाखवला तंबूचा रस्ता
ट्रेंडिंग लेख-
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण
-आयपीएलमध्ये डंका वाजलाच, आता ‘मिशन ऑस्ट्रेलिया’; ‘हा’ आर्किटेक्ट बांधणार संघाच्या विजयाचा पूल
-एमएस धोनीच्या गावचा पोरगा, जो चेन्नईकडून आयपीएलमध्ये करतोय पदार्पण