भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर सुरू आहे. कसोटीचा नवा बादशाह कोण होणार याची चढाओढ पहायला मिळत आहे. मैदानावर खेळ सुरु असताना मैदाना बाहेर माजी भारतीय खेळाडू सर्वांची मने जिंकत आहेत. होय, हरभजन सिंग पाकिस्तानी चाहत्यासाठी गुडघ्यावर बसल्याचे बघायला मिळाले. असे का झाले हा प्रश्न सर्वांनाच आहे. हरभजनने ओव्हलमध्ये सार्वजनिकरित्या असे का केले? ते पाहूयात. या संदर्भात एक व्हिडीओ देखील इंटरनेटवर तुफान व्हारल होत आहे.
क्रिकट व्यतिरिक्त भारत आणि पाकिस्तानचे संबंध कसे आहेत हे सर्वांनाच माहीत आहे. पण, हरभजन सिंगने जे केले ते आपण कोणत्याही पारड्यात तोलू शकत नाही. त्याने जे काही केले ते त्याच्या चाहत्यांसाठी केले. टर्बनेटर या नावाने हरभजन पाकिस्तानमध्ये खूप लोकप्रिय आहे. अशा स्थितीत त्याचे काही पाकिस्तानी चाहतेही त्याला भेटण्यासाठी ओव्हवर आले आहेत.
हरभजन सिंगने पाकिस्तानी चाहत्याची घेतली भेट
हरभजन ओव्हलवर गुडघे टेकून बसला तो पाकिस्तानमधील त्याचा चाहता होता. ते मूल शारीरिकदृष्ट्या अपंग आहे. व्हील चेअरवर बसून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामना पाहण्यासाठी ओव्हलमध्ये आला होता. तर, अशा स्थितीत हरभजनला पाहताच त्याने त्याच्या ऑटोग्राफची इच्छा व्यक्त केली आणि हरभजनने गुडघ्यावर बसून त्याची इच्छा पूर्ण केली.
हरभजनने पाकिस्तानी चाहत्याला दिला ऑटोग्राफ
हरभजनचा (Harbhajan Singh) त्याच्या पाकिस्तानी फॅन्ससोबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हरभजन एका छोट्या बॅटवर कसा ऑटोग्राफ देत आहे. व्हिडीओ काढणाऱ्या एका व्यक्तीने भज्जीच्या चाहत्याला प्रश्न करत विचाले की, तु कुणाचा मित्र आहेस ? त्यावेळी त्याने शोएब अख्तरचे नाव घेतले. त्यावेळी भज्जी हसत तिथून निघून गेला.
My respect for Harbhajan Singh just went on to another level ♥️ #WTCFinal2023 #WTCFinal @harbhajan_singh @shoaib100mph pic.twitter.com/yvuJxEEpt4
— Farid Khan (@_FaridKhan) June 8, 2023
शोएब अख्तर आणि हरभजन सिंग यांची मैत्री प्रसिद्ध
क्रिकेटचे मैदान असो की बाहेर, हरभजन आणि शोएब अख्तर (Shoaib Akhtar) हे दोघेही कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेमध्ये असतात. मोठी गोष्ट म्हणजे दोघांपैकी कोणीही कोणाची खिल्ली उडवण्याची संधी सोडत नाही. मात्र, हरभजन सिंग सध्या इंग्लंडमध्ये समालोचनासाठी (World Test Championship) पोहोचला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विक्रमवीर रोहित! 15 धावांवर बाद होऊनही रचला इतिहास, ICC Finalमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा एकटाच खेळाडू
नॉटआऊट असूनही रहाणेला पंचांनी दिले आऊट, मग मैदानात झालेला ड्रामा आख्ख्या जगाने पाहिला; Video