इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम सुरु होण्यासाठी आता केवळ आठवड्याभराचा कालावधी राहिला आहे. ९ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या आयपीएलच्या १४ व्या हंगामासाठी सर्व संघांचे खेळाडू आपापल्या संघांत दाखल झाले आहेत. अनेक खेळाडूंनी सरावही सुरु केली आहे. तर काही खेळाडू क्वारंटाईनमध्ये आहेत. दरम्यान, यंदा कोलकाता नाईट रायडर्स संघात सामील झालेला हरभजन सिंगचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
कोरोना अहवाल निगेटिव्ह म्हणून हरभजनचा भांगडा
हरभजन सिंग काही दिवसांपूर्वी केकेआरचा संघ थांबलेल्या हॉटेलमध्ये दाखल झाला होता. त्यानंतर त्याने ७ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला आहे. नुकताच केकेआरने त्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात तो मास्क घालून हॉटेल रुममधून बाहेर येताना दिसत आहे. तसेच जेव्हा त्याला रुममधून बाहेर येण्याचे कारण विचारले जाते तेव्हा तो म्हणत आहे की त्याचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आला आहे आणि आता तो सरावासाठी जात आहे. यानंतर हरभजन भांगडा करण्यासही सुरुवात करतो.
https://www.instagram.com/p/CNMW_jsFgHs/
क्वारंटाईन दरम्यान काही खेळाडूंचे कोरोना पॉझिटिव्ह
आयपीएल २०२१ साठी ७ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करत असताना केकेआरच्या नितीश राणाचा तसेच दिल्ली कॅपिटल्सच्या अक्षर पटेलचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. पण राणाचा दुसरा अहवाल निगेटीव्ह आला असल्याने तो आता सराव करु शकतो. मात्र, अक्षरला एकांतवासात काही दिवस राहावे लागणार आहे.
चेन्नईने मुक्त केले होते हरभजनला
हरभजन २०१८ आयपीएल हंगामापासून चेन्नई सुपर किंग्स संघाचा सदस्य होता. मात्र २०२१ हंगामाच्या लिलावापूर्वी त्यांनी हरभजनला संघातून मुक्त केले होते. त्यामुळे हरभजन २ कोटीच्या मुळकिमतीसह लिलावात उतरला होता. लिलावादरम्यान त्याला केकेआरने त्याला खरेदी करत आपल्या संघात घेतले.
हरभजनची आयपीएल कारकिर्द
हरभजन सिंगने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत सुरुवातीला मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले आहे. तो २००८ ते २०१७ दरम्यान मुंबईकडून खेळला. तर २०१८ नंतर तो चेन्नईकडून खेळला. २०२० हंगामातून त्याने माघार घेतल्याने तो मागील वर्षी खेळताना दिसला नव्हता. पण आता तो यंदाच्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना दिसणार आहे.
हरभजनने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत १६० सामन्यांत १५० विकेट्स घेतल्या आहेत. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ५ व्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘हा’ आहे सध्याच्या भारतीय संघातील गांगुलीचा आवडता खेळाडू
आयपीएलमधील ‘हे’ ७ विक्रम आहेत केवळ एमएस धोनीच्याच नावावर
आयपीएल इतिहासात ‘या’ ५ खेळाडूंना बाद देण्याच्या निर्णयामुळे झाले होते वाद