भारतीय ऑफस्पिनर गोलंदारज हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने सर्वप्रकारच्या क्रिकेटला रामराम केला आहे. आता तो एक मेंटर (Mentor) म्हणून आयपीएल संघात सामील होण्याची शक्यता आहे. त्याने दिलेल्या एका मुलाखतीत याविषयी माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, माजी क्रिकेटर हरभजन सिंग आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) मेंटर होऊ शकतो. या मुद्द्यावर फ्रेंचाईजी आणि हरभजन यांच्यात बोलणी सुरू असल्याचे त्याने एका मुलाखतीत सांगितले आहे. हरभजनने क्रिकेटला अलविदा केला आहे. मात्र, प्रशिक्षकाच्या स्वरूपात आपल्याला त्याला एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. याशिवाय तो समालोचन करताना दिसून येईल.
अशी राहिली आंतरराष्ट्रीय कारकीर्द
हरभजन सिंग याने आपल्या २३ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत १०३ कसोटी सामने खेळताना ४१७ बळी मिळवले. तर २३६ वनडे सामन्या त्याच्या नावे २६९ बळी जमा आहेत. याव्यतिरिक्त टी२० क्रिकेटमध्ये त्याने २८ सामने खेळताना २५ बळी मिळवले होते. तो आयपीएलमध्ये १५० बळी पूर्ण करणारा केवळ चौथा गोलंदाज होता.
अधिक वाचा – गोष्ट एका क्रिकेटरची भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग
आयपीएलमध्ये त्याने मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स व कोलकाता नाईट रायडर्स या संघाचे प्रतिनिधित्व केले. हरभजन २००७ टी२० विश्वचषक व २०११ वनडे विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य होता. अनिल कुंबळे यांच्यानंतर त्याने अनेक वर्ष भारतीय क्रिकेटच्या फिरकी आक्रमणाची धुरा सांभाळली.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतातही महिला क्रिकेटपटूंसाठी आयपीएलसारखी लीग असणार? जय शाह यांनी दिले ‘हे’ उत्तर
मोठी बातमी!! रॉस टेलरची निवृत्तीची घोषणा; ‘या’ संघांविरुद्ध खेळणार अखेरचे सामने
ना शतक ना प्रभाव! २०२१ मध्ये विराट ‘सुपरफ्लॉप’
व्हिडिओ पाहा – टीम इंडियाला सोडलं, पण एअरपोर्टवर एकट्या हरभजनला पकडलं |