यावर्षी अनेक दिग्गज खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले आहे. काही दिवसांपूर्वीच भारतीय संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंग याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता. आता न्यूझीलंड संघातील दिग्गज फलंदाज रॉस टेलर याने निवृत्तीची घोषणा केली आहे.
न्यूझीलंड संघासाठी गेली अनेक वर्ष मोलाची भूमिका बजावणारा फलंदाज रॉस टेलर (Ross Taylor) लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे, ज्याची माहिती त्याने सोशल मीडिया पोस्ट द्वारे दिली आहे. तो मायदेशातील काही मालिका खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे.
तो बांगलादेश संघाविरुद्ध होणारी कसोटी मालिका, ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड संघाविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिका खेळताना दिसून येऊ शकतो. तो सध्या ३७ वर्षांचा आहे. ८ मार्च २०२२ रोजी तो ३८ वर्षांचा होणार आहे.(Ross Taylor instagram post)
रोज टेलरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले की, “आज मी मायदेशातील उन्हाळी हंगाम संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त घेणार असल्याची घोषणा करतोय. बांगलादेश संघाविरुद्ध २ कसोटी सामने, ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड संघाविरुद्ध होणारे ६ वनडे सामने. १७ वर्ष मला पाठिंबा दिल्यामुळे तुमचे आभार. देशासाठी खेळणं ही खूप अभिमानाची गोष्ट आहे.” (Ross Taylor announced retirement)
Today I'm announcing my retirement from international cricket at the conclusion of the home summer, two more tests against Bangladesh, and six odi’s against Australia & the Netherlands. Thank you for 17 years of incredible support. It’s been an honour to represent my country #234 pic.twitter.com/OTy1rsxkYp
— Ross Taylor (@RossLTaylor) December 29, 2021
रॉस टेलरची कारकीर्द
न्यूझीलंड (Cricket Newzealand) संघातील दिग्गज आणि विश्वासू फलंदाज रॉस टेलर याने आपल्या १७ वर्षांच्या कारकीर्दीत अनेक मोठ मोठे विक्रम आपल्या नावावर केले. त्याने ११० कसोटी सामन्यांमध्ये ७५८४ धावा केल्या. तर २३३ वनडे सामन्यांमध्ये ८५८१ आणि १०२ टी२० सामन्यांमध्ये १९०९ धावा केल्या आहेत. न्यूझीलंड संघासाठी कसोटी क्रिकेट आणि वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा रॉस टेलरच्या नावे आहे.
महत्वाच्या बातम्या :
खरा कर्णधार..! दुखापतीनंतर मैदानावर परतलेल्या बुमराहसाठी कर्णधार कोहलीची मन जिंकणारी कृती
सिराजवर चढला रोनाल्डोचा फिव्हर, पहिली विकेट घेतल्यानंतर जबरदस्त प्रदर्शन करत लुटली मैफिल
हे नक्की पाहा : हे आहेत भारतीय गोलंदाज, पण फलंदाजी करताना कसोटीत केलंय शतक |