भारतातील महिला क्रिकेट दिवसेंदिवस प्रगती करत आहे. भारतीय महिला खेळाडूंनी बिग बॅश लीग, द हंड्रेड या लीगमध्ये चांगली कामगिरी करून दाखवली. भारतात कायम महिला आयपीएलची चर्चा रंगत असते. पुरुष आयपीएलसोबतच बीसीसीआय वुमेन्स टी२० चॅलेंज नावाची स्पर्धा आयोजित करत असते. मात्र, त्यात चारच संघ असतात. यामुळे महिला खेळाडूंनी या विरोधात कायम आवाज उठवला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी म्हटले की, “बोर्ड महिला क्रिकेटपटूंना आयपीएलप्रमाणे लीग आणण्यावर काम करत आहे. वुमेन्स टी२० चॅलेंजवेळी चाहत्यांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. ही एक रोमांचक गोष्ट आहे. महिला क्रिकेटपटूंसाठी आयपीएलसारखी लीग आपल्या सर्वांना हवी आहे. मात्र, तीन -चार संघ एकत्र करून महिलांची आयपीएल सुरू करावी, असे नाही.”
शहा पुढे म्हणाले, “यासाठी अनेक गोष्टी महत्वाच्या आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडूंची उपलब्धता व दोन बोर्डांमधील द्विपक्षीय करार यासारखे अनेक घटक महत्त्वाचे आहेत. हे काही मुद्दे आहेत. आम्ही सर्व पर्यायांचा विचार करत आहोत आणि भविष्यात आमच्या महिला खेळाडूंसाठी अशाच प्रकारच्या लीग आयोजित करण्यावर काम करत आहोत.”
स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौर सारख्या खेळाडूंनी भारताची स्वतःची महिला लीग असावी, अशी मागणी केली होती.
अधिक वाचा – ‘ही’ आहे कसोटी क्रिकेटमधील २०२१ ची सर्वात फ्लॉप प्लेइंग Xi, जाणून घ्या कोणाला मिळाले कर्णधारपद
भारतीय महिला खेळाडूंविषयी बोलताना शहा म्हणाले की,”आयपीएलसारख्या लीगमुळे आपल्या खेळाडूंना निश्चित मदत होईल. कारण, त्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळेल.”
स्मृती आणि हरमनप्रीत व्यतिरिक्त भारताच्या उर्वरित खेळाडूंनीही परदेशी टी२० लीग मध्ये चांगली कामगिरी केली आहे. द हंड्रेड आणि WBBL मध्ये दीप्ती शर्मा, जेमिमा, शेफाली वर्मा आणि पूनम यादव यांनी परदेशी लीगमध्ये अप्रतिम कामगिरी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी!! रॉस टेलरची निवृत्तीची घोषणा; ‘या’ संघांविरुद्ध खेळणार अखेरचे सामने
ना शतक ना प्रभाव! २०२१ मध्ये विराट ‘सुपरफ्लॉप’
आगामी रणजी हंगामासाठी मुंबईचा २० सदस्यीय संघ घोषित; ‘सचिनपुत्र’ अर्जुनलाही संधी
व्हिडिओ पाहा – हे आहेत भारतीय गोलंदाज, पण फलंदाजी करताना कसोटीत केलंय शतक |