---Advertisement---

भज्जीच्या सर्वकालीन सर्वोत्तम संघात तेंडुलकर, धोनीला स्थान; मात्र, एकेकाळच्या सर्वात जवळच्या संघसहकाऱ्याकडे दुर्लक्ष

On: मंगळवार, जुलै 6, 2021 9:32 AM
---Advertisement---

भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग याने आपली सर्वकालीन प्लेइंग इलेव्हन संघाची घोषणा केली आहे. परंतु, मुख्य बाब म्हणजे त्याने ज्याला गुरू मानले होते, त्या दिग्गज खेळाडूला या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले नाही. चला तर पाहूया कशी आहे हरभजन सिंगने निवडलेली सर्वकालीन प्लेइंग इलेव्हन.

लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडच्या फेसबुक पेजवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये हरभजन सिंगने आपला सर्वकालीन प्लेइंग इलेव्हन संघ निवडला आहे. हरभजन सिंगने आपल्या या संघात सलामी फलंदाज म्हणून माजी भारतीय मास्टर ब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकरची निवड केली आहे. तर त्याच्यासोबत रोहित शर्माला आपल्या संघात स्थान दिले आहे.

तसेच तिसऱ्या क्रमांकावर त्याने रनमशिन विराट कोहलीला स्थान दिले आहे. तर चौथ्या क्रमांकासाठी हरभजन सिंगने दिग्गज ऑस्ट्रेलियन फलंदाज रिकी पाँटिंगची निवड केली आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून हरभजन सिंगने माजी दक्षिण आफ्रिकन खेळाडू जॅक कॅलिसला आपल्या संघात स्थान दिले आहे.(Harbhajan Singh picks his all time playing 11)

तसेच सहाव्या क्रमांकासाठी त्याने इंग्लंड संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू फ्लिंटॉफची निवड केली आहे. तर माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीला त्याने या संघात यष्टिरक्षक फलंदाज म्हणून स्थान दिले. तसेच कर्णधार म्हणूनही धोनीची निवड केली आहे. यासह त्याने फिरकी गोलंदाज म्हणून दिग्गज ऑस्ट्रेलियन फिरकीपटू शेन वॉर्न आणि मुथय्या मुरलीधरनला आपल्या संघात स्थान दिले आहे. धक्कादायक बाब ही आहे की, त्याने आपला जवळचा संघसहकारी अनिल कुंबळेला या संघात स्थान दिले नाही. दोघांनी मिळून भारतीय संघाला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत.

यासह त्याने जलद गोलंदाज म्हणून,वसिम अक्रम आणि श्रीलंकन संघाचा दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगाला स्थान दिले आहे.

हरभजन सिंगने निवडलेली सर्वकालिक प्लेइंग इलेव्हेन

सचिन तेंडूलकर, रोहित शर्मा, विराट कोहली, रिकी पाँटिंग,जॅक कॅलिस,अँड्र्यू फ्लिंटॉफ, एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक), शेन वॉर्न, वसीम अकरम, लसिथ मलिंगा, मुथैया मुरलीधरन

महत्वाच्या बातम्या-

हे पोरगं वेगळंच आहे!! एकीकडे संघसहकारी सुट्ट्यांची मजा घेत असताना सिराज करतोय इंग्लंडच्या रस्त्यांवरील पायऱ्यांवर सराव

‘लंका दहन’ करण्यासाठी भारतीय संघ सज्ज; सराव सामन्यात ‘या’ खेळाडूंनी घातला धुमाकूळ

इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघासाठी ‘ही’ आहे आनंदाची बातमी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---