विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यानंतर आता भारतीय संघासमोर बलाढ्य इंग्लंड संघाचे आव्हान असणार आहे. येत्या ४ ऑगस्टपासून भारत आणि इंग्लंड या संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. तत्पूर्वी, भारतीय संघातील खेळाडू मिळालेल्या सुट्टीचा आनंद घेताना दिसून येत आहे. परंतु, भारती संघातील मोहम्मद सिराज मात्र मिळालेल्या रिकाम्या वेळात कसून सराव करताना दिसून येत आहे.
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी अंतिम ११ जणांमध्ये संधी देण्यात आली नव्हती. परंतु, त्याला पूर्ण विश्वास आहे की, इंग्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत त्याला संधी मिळेल. त्यामुळेच, एकीकडे संघातील इतर खेळाडू मिळालेल्या सुट्टीचा आनंद घेत आहेत, तर दुसरीकडे मोहम्मद सिराज वेळेचा सदुपयोग करत कसून सराव करत आहे.
मोहम्मद सिराजने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो इंग्लंडच्या पायऱ्यांवर वर्कआऊट करताना दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये मोहम्मद सिराज पायऱ्या चढताना आणि उतरताना दिसून येत आहे. तसेच हा व्हिडिओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये वर्कआऊटचा ईमोजी टाकला आहे.
https://www.instagram.com/p/CQ8LBwaDU50/?utm_medium=copy_link
मोहम्मद सिराजने आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात २०२०-२१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून केली होती. त्याने पदार्पणाच्या कसोटी मालिकेत उल्लेखनीय कामगिरी करत आपली क्षमता दाखवून दिली होती. अनेक दिग्गजांनी असेही म्हटले होते की, विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मोहम्मद सिराजला संधी द्यायला हवी होती. परंतु, भारतीय संघ व्यवस्थापनाने त्याला अंतिम ११ जणांच्या संघात स्थान दिले नाही.(Mohammad siraj practicing on England street, video went viral on social media)
इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका
पहिली कसोटी- ४ ते ८ ऑगस्ट, नॉटिंघम
दुसरी कसोटी- १२ ते १६ ऑगस्ट, लॉर्ड्स
तिसरी कसोटी- २५ ते २९ ऑगस्ट, लीड्स
चौथी कसोटी- २ ते ६ सप्टेंबर, द ओव्हल
पाचवी कसोटी- १० ते १४ सप्टेंबर, मॅनचेस्टर
महत्त्वाच्या बातम्या –
‘लंका दहन’ करण्यासाठी भारतीय संघ सज्ज; सराव सामन्यात ‘या’ खेळाडूंनी घातला धुमाकूळ
इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघासाठी ‘ही’ आहे आनंदाची बातमी






