---Advertisement---

खासदार गंभीरचे ‘खास’ काम, संघसहकाऱ्याने केले तोंड भरून कौतुक

On: शुक्रवार, ऑगस्ट 20, 2021 9:08 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर राजकारणात सक्रिय झाला आहे. २०१९ लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीकडून पूर्व दिल्ली येथून निवडणूक लढवत तो खासदार झाला होता. त्यानंतर, त्याने आपल्या मतदारसंघात अनेक लोकोपयोगी कामे केली आहेत. गंभीरने नुकत्याच सुरू केलेल्या एका योजनेची सगळीकडे चर्चा होत असताना, त्याचा माजी संघसहकारी हरभजन सिंगने ट्विटरवरून व्हिडिओ शेअर करत त्याचे कौतुक केले.

गंभीरने सुरू केली ही योजना
खासदार म्हणून आपले कर्तव्य पार पाडताना गौतम गंभीरने अनेक नवनवे उपक्रम सुरू केले आहेत. त्यापैकीच एक असलेल्या जन रसोई या योजनेची तिसरी शाखा त्याने शुक्रवारी (२० ऑगस्ट) विनोद नगर येथे सुरू केली. या योजनेअंतर्गत दररोज १००० लोकांना केवळ १ रुपयात पोटभर जेवण दिले जाते. यापूर्वी गंभीरने या योजनेची पहिली शाखा मागील वर्षी डिसेंबर महिन्यात गांधीनगर येथे तर, दुसरी शाखा न्यू अशोक नगर येथे या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सुरू केली होती. तो आणखी काही ठिकाणी देखील अशाच प्रकारे जन रसोई सुरू करणार असल्याचे बोलले जात आहे.

https://twitter.com/harbhajan_singh/status/1428646342851588097?s=19

हरभजनने केले गंभीरचे कौतुक
या योजनेची सुरुवात केल्यानंतर गंभीरचा माजी संघसहकारी व दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगने त्याचे कौतुक केले. हरभजनने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला. यामध्ये तो म्हणाला,
“गौतम तू खूप छान काम करत आहेस. जन रसोई ही अप्रतिम योजना आहे. लोकांना जेवण देणे हे पुण्याचे काम आहे व तू ते करत आहेस. हे असेच पुढे चालू राहो.”
गंभीर व हरभजन हे अनेक वर्षे भारतीय संघाकडून एकत्रितरीत्या क्रिकेट खेळले. भारताने जिंकलेल्या २००७ टी२० विश्वचषक व २०११ वनडे विश्वचषक विजेत्या संघाचे ते सदस्य राहिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

https://mahasports.in/ashwin-reveal-reason-behind-not-playing-lords-test/

https://mahasports.in/the-oval-test-2006-unexpected-result-for-pakistan/

https://mahasports.in/eng-vs-ind-test-series-english-bowler-stuart-broad-share-his-latest-photo-with-wheelchair-on-social-media/

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---