---Advertisement---

निवृत्तीनंतर हरभजनचे धोनीवर गंभीर आरोप; म्हणाला…

On: रविवार, जानेवारी 2, 2022 12:27 AM
ms-dhoni-harbhajan-singh
---Advertisement---

भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंग (harbhajan singh) याने मागच्या काही दिवसांपूर्वी क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती घेतली. आता हरभजनने अजून एक मोठा खुलासा केला आहे. हरभजनने निवृत्ती घेण्यापूर्वी तो बराच काळ संघातून बाहेर होता. त्याच्या मते त्याला संघातून बाहेर करण्यामध्ये बीसीसीआयच्या काही अधिकाऱ्यांचा हात होता आणि त्यावेळी संघाचा कर्णधार असलेल्या एमएस धोनी (ms dhoni) यानेही त्या अधिकाऱ्यांचे समर्थन केले असावे. परंतू, धोनीच्या हातात जास्त काही नव्हते, असेही हरभजन पुढे म्हणाला.

संघातून बाहेर करण्यासंदर्भात हरभजन माध्यामांशी बोलताना म्हणाला की, “होय, एमएस धोनी तेव्हा कर्णधार होता. मात्र, मला वाटते ही गोष्ट धोनीच्या वरची होती. काही प्रमाणात यामध्ये बीसीसीआयचे काही अधिकारी देखील सामील होते आणि त्यांना मी नको होतो. कर्णधाराने त्यांचे समर्थन केले असेल. मात्र, एक कर्णधार कधीच बीसीसीआयच्या वरती असू शकत नाही. बीसीसीआयचे अधिकारी नेहमीच कर्णधार, प्रशिक्षक किंवा संघापेक्षा मोठे राहिले आहेत.”

एमएस धोनी संघाचा कर्णधार होता. त्याला स्वतःचे संघात स्थान कायम ठेवण्यासाठी अनुकूल वातावरण मिळाले आणि इतर खेळाडूंना ते मिळाले नाही, असे हरभजन म्हणाला. “धोनीला इतर खेळाडूंच्या तुलनेत चांगला पाठिंबा प्राप्त होता. असे नाहीये की, इतर खेळाडू अचानक बॅट फिरवायचे विसरले आहेत किंवा त्यांना गोलंदाजी करता येत नव्हती. जर त्यांनाही पाठींबा मिळाला असता, तर ते देखील खेळले असते”, असे हरभजन पुढे म्हणाला.

क्रिकेटमधून निवृत्ती घेण्यापूर्वी खेळलेल्या त्याच्या शेवटच्या सामन्याविषयी बोलताना हरभजन म्हणाला की, ” प्रत्येक खेळाडूची इच्छा असते की, त्याने भारतीय जर्सी घालून निवृत्ती घ्यावी. मात्र, प्रत्येकाचे नशीब तसे नसते. कधी-कधी जी तुमची इच्छा असते, ती पूर्ण होऊ शकत नाही. लक्ष्मण, राहुल द्रविड, विरेंद्र सेहवाग यांच्यासारख्या मोठ्या नावांना संधी मिळाली नाही आणि त्यांनी निवृत्ती घेतली.”

दरम्यान, क्रिकेटमधून निवृत्ती घेतानाही हरभजनने त्याला संघातून बाहेर केल्याची खंत व्यक्त केली होती. निवृत्ती घेताना तो म्हणाला होता की, “मी वयाच्या ३१ वर्षात ४०० कसोटी विकेट्स घेतल्या होत्या. मी अजून ४-५ वर्ष अजून खेळू शकत होतो. मात्र, मला संघातून बाहेर केले गेले. मला यामागचे कारणही सांगितले गेले नाही. मी अनेकांना विचारले, पण कोणीच याचे उत्तर दिले नाही.”

महत्वाच्या बातम्या –

जोहान्सबर्ग कसोटीसाठी भारतीय संघात होणार दोन बदल? अश्विन-शार्दुलचा पत्ता कट?

प्रो कबड्डी: थरारक सामन्यांनी रंगला ‘शानदार शनिवार’; अखेरच्या रेडवर तिन्ही सामने ‘टाय’

१ जानेवारी ही तारीख क्रिकेटविश्वात फक्त मायकल बेवनच्या ‘त्या’ खेळीसाठी ओळखली जाते

व्हिडिओ पाहा –

क्रिकेटमधील डक अन् त्याचे प्रकार | Explanation Of Duck In Cricket And Its Type

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---