भारतीय संघाने दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ११३ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने कसोटी मालिकेत १-० अशी आघाडीही घेतली. उभय संघातील दुसरा कसोटी सामना जोहान्सबर्ग येथे ३ जानेवारीपासून खेळला जाणार आहे. या मैदानावर मागच्या २९ वर्षांपासून भारताने एकही विजय मिळवलेला नाही. दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही महत्वाचे बदल केले जाऊ शकतात. यामध्ये शार्दुल ठाकुरच्या जागी वेगवान गोलंदाज उमेश यादव (Umesh Yadav) याला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. तर, दुसरीकडे रविचंद्रन अश्विनच्या जागी हनुमा विहारी (hanuma vihari) स्थान पक्के करू शकतो.
कर्णधार विराट कोहली विजय मिळवून देणाऱ्या संघात शक्यता बदल करत नाही. मात्र, जोहान्सबर्गमधील परिस्थिती पाहून, हे दोन महत्वाचे बदल होऊ शकतात. येथे फिरकी गोलंदाज अश्विनच्या जागी भारतीय संघ पुढच्या सामन्यात एका अतिरिक्त फलंदाजाला सामील करू इच्छित असेल. जर असे झाले, तर हनुमा विहारी संघात स्थान पक्के करू शकतो.
विदेशात जेव्हा कसोटी संघ निवडण्याची वेळ येत, तेव्हा कर्णधार विराट कोहली (virat kohli) शक्यतो पाचव्या गोलंदाजाच्या रूपात गोलंदाजी अष्टपैलूला संघात सामील करतो. यामुळे संघाचे संतुलन व्यवस्थित राहते. याच कारणास्तव शार्दुल ठाकुरला अनेकदा कसोटी संघात संधी मिळते. परंतु, दुसरा सामना खेळला जाणाऱ्या जोहान्सबर्गच्या खेळपट्टीवर गवत दिसू लागले आहे. अशात संघात वेगान गोलंदाज उमेश यादवला संधी दिली जाऊ शकते.
जोहान्सबर्गमध्ये मागच्या काही दिवसांमध्ये पाऊस पडला आणि त्यामुळे खेळपट्टीवर गवत आहे. हवेतही दमटपणा आहे आणि त्यामुळे वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते. उमेश यादवची स्विंग गोलंदाजी देखील या परिस्थितीत प्रभावी ठरू शकते. तत्पूर्वी, सेंचुरियनमधील सामन्यात शार्दुल ठाकुरला काही खास प्रदर्शन करता आले नव्हते. शार्दुलने या सामन्यात १४ धावा केल्या आणि १६ षटके गोलंदाजी करून अवघ्या दोन विकेट्स घेतल्या. उमेश यादव १४० किलोमीटर ताशी वेगाने गोलंदाजी करू शकतो. त्याच्या या गोलंदाजीचा दुसऱ्या सामन्यात संघाला नक्कीच फायदा होईल.
महत्वाच्या बातम्या –
‘भारतीय संघ भित्रेपणाने खेळला, असे वाटले’, टी२० विश्वचषकातील कामगिरीबाबत रवी शास्त्रींचे मोठे भाष्य
रोहित-विराट वादाविषयी निवडसमिती म्हणातायेत, “ते दोघे…”
ऋतुराज गायकवाडला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळणार स्थान? निवड समीती प्रमुखांनी दिले उत्तर
व्हिडिओ पाहा –