भारतीय संघ (team india) सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर (india tour of south africa) आहे. दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्यात सध्या तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जातेय. कसोटी मालिकेनंतर उभय संघात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. शुक्रवारी (३१ डिसेंबर) बीसीसआयने या आगामी एकदिवसीय मालिकेसाठी संघाची घोषणा केली. वेगवान गोलंदाज दीपक चहर (deepak chahar) याला या संघात सामील केले गेल आहे. चहरला संघात सामील केल्यानंतर माजी दिग्गज आकाश चोप्रा (aakash chopra) यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
दक्षिण अफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत अनुपस्थित राहिल्यानंतर रोहित शर्मा एकदिवसीय मालिकेत देखील सामील होऊ शकलेला नाही. दुखापतीमुळे रोहितला नियमित कर्णधाराच्या रूपातील त्याच्या पहिल्या एकदिवसीय मालिकेला मुकावे लागेल. रोहितच्या अनुपस्थितीत केएल राहुलकडे संघाचे नेतृत्व सोपण्यात आले आहे. तर, जसप्रीत बुमराह संघाचा उपकर्णधार असेल. त्याव्यतिरिक्त अनुभवी शिखर धवनने देखील मोठ्या काळानंतर संघात पुनरागमन केले आहे. दीपक चहरला देखील आगामी एकदिवसीय मालिकेत संधी मिळाली आहे.
आकाश चोप्रांच्या मते, दीपक चहरवर प्रशिक्षक राहुल द्रविडचा पूर्ण विश्वास आहे आणि त्यामुळेच त्याला आगामी मालिकेत निवडले गेले आहे. स्वतःच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना आकाश चोप्रा म्हणाले की, “जसप्रीत बुमराह उपकर्णधार आहे. भुवनेश्वर कुमार, दीपक चहर देखील संघात आहेत. भुवी खूप उत्कृष्ट गोलंदाजी करत आहे. त्याने मागच्या दोन टी२० सामन्यांमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. दीपक थोडा महागडा ठरला होता. मात्र, तरीदेखील त्याला संघात ठेवले गेले, जी खूप चांगली गोष्ट आहे. राहुल द्रविड त्याला एका पॅकेजप्रमाणे पाहतो.”
दक्षिण अफ्रिकेविरुद्ध आगामी एकदिवसीय मालिकेसाठी निवडलेला भारतीय संघ –
ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, लोकेश राहुल (कर्णधार), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, ईशान किशन, रिषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, वेंकटेश अय्यर, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, दीपक चाहर, प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार आणि शार्दुल ठाकुर.
महत्वाच्या बातम्या –
‘भारतीय संघ भित्रेपणाने खेळला, असे वाटले’, टी२० विश्वचषकातील कामगिरीबाबत रवी शास्त्रींचे मोठे भाष्य
रोहित-विराट वादाविषयी निवडसमिती म्हणातायेत, “ते दोघे…”
शास्त्री ‘लगे रहो’ म्हणाले आणि गाबामध्ये गिल-पंतने इतिहास रचला; वाचा सविस्तर
व्हिडिओ पाहा –