जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून 209 धावांच्या अंतराने पराभूत झाला. या पराभवानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा टीकाकारांच्या चांगलाच निशाण्यावर आहे. रोहित शर्मा मागच्या वर्षी विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर तिन्ही प्रकारांमध्ये भारताचा कर्णधार बनला. असे असले तरी, त्याला वैयक्तिक आणि संघिक प्रदर्शनामुळे नेहमी टीकेचा सामना करावा लागाल आहे. अशातच भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग याने मात्र रोहितची पाठराखण केली आहे.
भारतीय संघाला सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. कर्णधार म्हणून रोहितने या सामन्यात काही असे निर्णय घेतले ज्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. रविचंद्रन अश्विन याला बाहेर बसवण्याचा निर्णय अनेकांना पटला नव्हता. तसेच गोलंदाजी बदलात देखील रोहित काहीसा कमी पडलेल्या दिसून आला. या व्यतिरिक्त फलंदाज म्हणून देखील दोन्ही सामन्यात रोहित अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. त्यामुळेच त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. या सर्व पार्श्वभूमीवर एका मुलाखतीत बोलताना रोहित शर्माचा एकेकाळी संघ सहकारी राहिलेला हरभजन सिंग म्हणाला,
“मी काही दिवसांपासून पाहत आहे की लोक रोहित शर्मावर टीका करताना पातळी सोडत आहेत. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. केवळ एकटा खेळाडू तुम्हाला सर्व काही करून देऊ शकत नाही. तुम्ही त्याच्या कामगिरीबद्दल निश्चित बोलू शकता. मात्र, एकट्याला लक्ष करणे चुकीचे आहे. नेतृत्वात प्रत्येकाकडून काहीतरी चुका होतात. मात्र, रोहितला मोठा अनुभव असून तो एक सच्चा नेता आहे.”
या सामन्यानंतर भारतीय संघ आता प्रथमच मैदानावर उतरेल. 12 जुलैपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडीजविरूद्धच्या मालिकेत रोहितच भारताचे नेतृत्व करताना दिसेल.
(Harbhajan Singh Said Don’t Blame Rohit Sharma Alone For Poor Team Performance)
महत्वाच्या बातम्या-
वेस्ट इंडिजमध्ये नेहमीच तळपते मराठमोळ्या अजिंक्यची बॅट, आतापर्यंतचा रेकॉर्ड 140 कोटी भारतीयांची मान उंचावणारा
‘बिल्कुल नाही, ऑस्ट्रेलियाला या पराभवाचा…’, इंग्लंडविरुद्ध हारताच कमिन्सचे मोठे विधान, लगेच वाचा