भारतीय संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंग (Harbhajan Singh)याने काहीदिवसांपूर्वी क्रिकेटला राम राम केला आहे. त्याने २३ वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीत अनेक मोठ मोठ विक्रम आपल्या नावावर केले आहेत. तसेच भारतीय संघाला २००७ टी२० विश्वचषक आणि २०११ आयसीसी विश्वचषक स्पर्धेत विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. दरम्यान आता निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्याने एमएस धोनी याच्याबद्दल (Ms dhoni) मोठा खुलासा केला आहे.
हरभजन सिंगला २०११ विश्वचषक स्पर्धेनंतर केवळ १० वनडे आणि १० कसोटी सामने खेळायची संधी मिळाली. त्याला २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०१५ विश्वचषक स्पर्धेत देखील स्थान देण्यात आले नव्हते.
आता याबाबत बोलताना हरभजन सिंग म्हणाला की, “४०० गडी बाद करणाऱ्या व्यक्तीला कसं बाहेर केलं जाऊ शकतं, ही एक रहस्यमय कथा आहे, जी अजूनही समोर आली नाहीये. मला अजुनही आश्चर्य वाटते, ‘नक्की काय झालं होतं? माझ्या संघात असण्यात कोणाला अडचण होती?'(harbhajan singh statement on ms dhoni)
तसेच हरभजन सिंगने इंडिया टिव्ही सोबत बोलताना खुलासा केला आहे की, एकवेळा त्याने एमएस धोनीला आपल्या अनुपस्थितीबद्दल विचारण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, एमएस धोनीने काहीच प्रतिक्रीया दिली नव्हती. जेव्हा त्याला जाणवले की, विचारण्यात काहीच अर्थ नाही. तेव्हापासून हरभजन सिंगने विचारणं सोडून दिलं होतं.
याबाबत बोलताना तो म्हणाला की, “मी एमएस धोनीला अनेकदा विचारण्याचा प्रयत्न केला. परंतु, मला काहीच सांगितले नाही. त्यावेळी मला जाणवले की, आता कारण विचारण्यात काहीच अर्थ नाही. कारण आपण विचारत असतो आणि त्याचं उत्तर मिळत नसेल, तर विचारण्यात काहीच एक अर्थ नसतो.”
हरभजन सिंगची कारकीर्द
हरभजन सिंगने आपल्या कारकीर्दीत एकूण १०३ कसोटी क्रिकेट सामने खेळले ज्यामध्ये त्याने एकूण ४१७ गडी बाद केले. तसेच २३६ वनडे सामन्यांमध्ये त्याने २६९ गडी बाद केले होते. तर २८ टी२० सामन्यात त्याने २५ गडी बाद केले होते.
महत्वाच्या बातम्या :
भारताविरुद्धच्या पराभवानंतर स्टार क्रिकेटर क्विंटन डी कॉकने कसोटी क्रिकेटला केला अलविदा
हे नक्की पाहा : विरोधी संघातील गोलंदाजांना Golden Watches भेट देणारा Captain






