जगभरात गेल्या २ वर्षांपासून कोरोना व्हायरसचे संकट वाढत आहे. कोट्यावधी लोक या व्हायरसच्या विळख्यात अडकली आहेत. नुकताच भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग देखील कोरोना संक्रमित झाल्याचे त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले आहेत.
हरभजनने सांगितले आहे की, त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही तपासणी करून घ्यावी. तसेच तो सध्या क्वारंटाईनमध्ये आहे.
४१ वर्षीय हरभजनने ट्वीट केले आहे की, ‘माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मला कोरोनाची सौम्य लक्षणे होती. मी स्वत:ला घरात क्वारंटाईन केले असून सर्व खबरदारी घेत आहे. ज्या व्यक्ती माझ्या संपर्कात आल्या आहेत, त्यांनी लवकरात लवकर स्वत:च्या तपासणी करून घ्यावी. कृपया सुरक्षित राहा आणि काळजी घ्या.’
I've tested positive for COVID with mild symptoms. I have quarantined myself at home and taking all the necessary precautions.
I would request those who came in contact with me to get themselves tested at the earliest. Please be safe and take care 🙏🙏— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) January 21, 2022
हरभजनने नुकतेच क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली होती. त्याने २४ डिसेंबरला सोशल मीडियावर पोस्ट करत त्याचा निवृत्तीचा निर्णय सर्वांसमोर आणला होता. त्याच्या निवृत्तीनंतर तो राजकारणात उतरण्याची चर्चाही जोरदार झाली होती. मात्र, त्याने स्पष्ट केले की, जेव्हा तो कोणताही निर्णय घेईल, तेव्हा तो सर्वांना सांगेल.
अधिक वाचा – हरभजन सिंगने निवडली त्याची ‘ऑल टाइम इलेव्हन’; विराटला जागा दिली, पण नेतृत्त्वपद नाही
हरभजन सिंगची कारकिर्द
साल १९९८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या हरभजन सिंगने १०३ कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ३२.४६ च्या सरासरीने ४१७ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने २ शतकांसह २२२४ धावाही केल्या आहेत. तो कसोटीत ४०० पेक्षा अधिक विकेट्स घेणारा भारताचा दुसरा गोलंदाज होता.
त्याचबरोबर २३६ वनडे सामन्यांमध्ये त्याने ३३.३५ च्या सरासरीने २६९ विकेट्स घेतल्या आहेत आणि १२३७ धावा केल्या आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर २८ टी२० सामनेही खेळले असून २५ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच हरभजन २००७ टी२० विश्वचषक आणि २०११ वनडे विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा भागही होता.
व्हिडिओ पाहा – टीम इंडियाला सोडलं, पण एअरपोर्टवर एकट्या हरभजनला पकडलं
त्याचबरोबर आयपीएलमध्ये हरभजनने १६३ सामने खेळले असून १५० विकेट्स घेतल्या आहेत. तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांकडून खेळला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
एअर इंडिया कॉलनीमधील ‘त्या’ घरामध्ये सुशांत ‘त्याच’ ठिकाणी जमिनीवर जाऊन झोपला
दुसरी वनडे : केएल राहुलने टाॅस जिंकला, भारत प्रथम बॅटींग करणार; पाहा कोणकोण खेळतंय दुसर्या सामन्यात
लेजेंड्स क्रिकेट लीग: इंडिया महाराजा संघाची विजयी सलामी; आशिया लायन्सवर ६ गडी राखून विजय