इंडियन प्रीमियर लीगच्या मुंबई इंडियन्स संघात एकाहून एक दमदार खेळाडूंचा भरणा आहे. सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, हार्दिक पंड्या ही त्यातील काही नावे आहेत. या खेळाडूंव्यतिरिक्त यष्टीरक्षक फलंदाज इशान किशननेही आयपीएल २०२०मध्ये कमालीचे फलंदाजी प्रदर्शन केले आहे. परंतु, अद्यापही या २२ वर्षीय धुरंधराला भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. मात्र आता माजी भारतीय फिरकीपटू हरभजन सिंगने इशानविषयी मोठे वक्तव्य केले आहे.
लवकरच करेल भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व
झाले असे की, इशानने शनिवारी (३१ ऑक्टोबर) दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात संघाला एकहाती विजय मिळवून दिला. या सामन्यात त्याने सलामीला फलंदाजी करताना ४७ चेंडूत नाबाद ७२ धावा केल्या होत्या. त्यानंतर प्रसिद्ध भारतीय समालोचक आकाश चोप्रा यांनी ट्विट करत त्याचे कौतुक केले.
त्यांनी लिहिले की, ‘इथून पुढे जेव्हाही आम्ही भारतीय संघाच्या नव्या प्रतिभाशाली यष्टीरक्षक फलंदाजाविषयी चर्चा करु. तेव्हा सर्वप्रथम इशान किशनचे नाव घेतले जाईल. त्याच्यामध्ये अफाट प्रतिभा आणि कौशल्य आहे.’ आकाश चोप्रा यांच्या त्या ट्विटला हरभजनने रिट्विट करत लिहिले की, ‘खरोखरच इशान किशनमध्ये कमालीची प्रतिभा आहे. तो लवकरच भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व करताना दिसेल.’
Yeah super talented #IshanKisan @mipaltan he will surely play for india soon https://t.co/yDMyByOacR
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) October 31, 2020
इशानची आयपीएल २०२० मधील आकडेवारी
२०१६ पासून आयपीएलमध्ये खेळत असलेला इशान किशन यावर्षी चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे दिसत आहे. त्याने आयपीएल २०२०मध्ये आतापर्यंत ११ सामने खेळले असून ३९५ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ३ अर्धशतकांचा समावेश आहे. एवढेच नव्हे तर, त्याने या हंगामातील एका सामन्यात सर्वाधिक ९९ धावांची कमागिरीही केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
प्रशिक्षकाच्या ‘त्या’ ७ वर्षांपुर्वीच्या सल्ल्याने बदलले ऋतुराजचे जीवन, आता ठरला सीएसकेचा मॅच विनर
‘धोनीच्या शेवटच्या सामन्यासाठी पाहायचीय मोठी गर्दी,’ इंग्लंडच्या दिग्गजाचे वक्तव्य
DC vs RCB: पहिल्या डावानंतर चित्र स्पष्ट; दोन्ही संघांसाठी क्वालिफायचं समीकरण अखेर ठरलं!
ट्रेंडिंग लेख-
वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?
प्ले ऑफ अभी दूर नहीं! ३ जागा, ३ संघ आणि २ सामने; पाहा कशी आहेत प्लेऑफची समीकरणे
IPL 2020 : कोलकाताच्या ‘या’ पाच खेळाडूंपुढे राजस्थानने टेकले गुडघे