भारत आणि इंग्लंड संघात बुधवारपासून (४ ऑगस्ट) ५ सामन्यांची कसोटी मालिका सुरु झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडच्या नॉटिंघमच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. त्यातच या मालिकेपूर्वी भारतीय पूर्व फिरकीपटू गोलंदाज हरभजन सिंगने या मालिकेबद्दल एक वक्तव्य केले आहे. हरभजन सिंगने मत आहे की भारताला या मालिकेत अष्टपैलू हरभजन सिंगची कमतरता भासू शकते.
तो म्हणाला “नॉटिंघमच्या मैदानावर भारतीय संघाला हार्दिक पांड्याची कमतरता भासू शकते. कारण, भारताच्या मागील इंग्लंड दौऱ्यात हार्दिकने नॉटिंघमच्या मैदानात उत्कृष्ट कामगिरी केली होती. ज्यात त्याने पहिल्या डावात ६ षटकात २८ धावा देत ५ विकेट घेतल्या होत्या. ज्यामुळे भारतीय संघ १६८ धावांनी आघाडीवर होता. परंतु, यंदाच्या दौऱ्यात हार्दिकला भारतीय संघात स्थान मिळालेले नाही”
पुढे तो म्हणाला, ‘माझ्या मते हार्दिकचा भारतीय संघात समावेश न केल्याने भारतीय संघाला ते महागात पडू शकते. कारण हार्दिकने मागील दौर्यात इंग्लंड विरुद्ध कमालीची कामगिरी केली होती. त्याचबरोबर सर्वांना माहिती आहे की, नॉटिंघमचे मैदान नेहमीच स्विंग गोलंदाजांसाठी पूरक असे मैदान राहिले आहे. त्यामुळे इंग्लंडचा संघ नेहमीच या मैदानावर खेळण्यास उत्सुक असतो, कारण त्यांचे गोलंदाज या मैदानावर चांगली कामगिरी करतात.’
त्याचबरोबर तो असेही म्हणाला की हार्दिक एक अष्टपैलू खेळाडू आहे. त्यामुळे नॉटिंघमच्या मैदानावर भारतीय संघाला त्याचा खूप फायदा झाला असता. भारतीय संघात त्याचा समावेश करणे फायद्याचे ठरले असते. खास करून इंग्लंडसारख्या मैदानात त्याने महत्त्वाच्या वेळी गोलंदाजी करून संघात मोलाची भूमिका साकारली असती. त्याचबरोबर त्याने फलंदाज म्हणून भारतीय संघाचे फलंदाजी क्षेत्रही मजबूत केले असते.
दरम्यान, दोन वर्षांपूर्वी हार्दिकच्या मणक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तेव्हापासून हार्दिकला गोलंदाजीत म्हणावे तसे यश प्राप्त करता आले नाही. तसेच नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौऱ्यातही हार्दिकची कामगिरी असमाधानकारक राहिली होती.
महत्वाच्या बातम्या –
–अभिनंदन! इंग्लंडचा सर्वात यशस्वी फलंदाज बनला रूट, केली ‘ही’ अद्वितीय कामगिरी
–दिलदार विराट! छोट्या चाहत्याला ‘खास’ भेटवस्तू देत कोहलीने जिंकली चाहत्यांची मने