---Advertisement---

VIDEO: वडिलांची आठवण येताच हार्दिकच्या अश्रूंचा फुटला बांध; इरफानच्या गळ्यात पडत धाय मोकलून रडला

---Advertisement---

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात (T20 World Cup) रविवारी (23 ऑक्टोबर) भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvPAK) सामना रंगला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारताने विजय मिळवला. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला गेलेला हा सामना भारताने 4 विकेट्सने जिंकला. या सामन्यात भारताकडून स्फोटक फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या यांनी भारताच्या विजयात महत्वाची भुमिका निभावली. भारताच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिलेल्या हार्दिकला सामन्यानंतर झालेल्या मुलाखतीत मात्र आपले अश्रू रोखता आले नाही.

हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने पाकिस्तानविरुद्ध चमकदार खेळ दाखवल. सुरूवातीला त्याने गोलंदाजी करताना 4 षटकात 30 धावा देत 3 प्रमुख बळी घेतले. तसेच फलंदाजीत संघाचे चार फलंदाज केवळ 31 धावांवर बाद झालेले असताना 40 धावांची महत्वाची खेळी केली.

 

या ऐतिहासिक विजयानंतर मुलाखतीत माजी भारतीय अष्टपैलू इरफान पठाण व टीव्ही अँकर जतिन सप्रू यांच्याशी बोलताना हार्दिकने सामन्यातील अनेक घटनांचा उलगडा केला. आम्ही खेळाडू अशाच प्रकारच्या चाहत्यांच्या पाठिंब्यासाठी आसुसलेले असतो असे तो म्हणाला. याच मुलाखतीत त्याला आपल्या वडिलांची देखील आठवण झाली. बोलता बोलता तो म्हणाला,

https://twitter.com/BhinderChris_H/status/1584158603099123712?t=dQ4PG8YYy6zH_pVrnE4Y_A&s=19

“त्यांनी आमच्यासाठी खूप कष्ट केले. अनेक गोष्टींचे बलिदान दिले. आम्ही सहा वर्षाचे असताना त्यांनी शहर सोडले. मी देखील माझ्या मुलांसाठी इतके कधीच करू शकणार नाही.”

त्यावेळी त्याला अश्रू अनावर झाले व तो डोळे पुसताना दिसला. तेव्हा इरफान व जतिन यांनी त्याला मिठी मारत, ते जिथे कोठे असतील तेथून तुझा खेळ पाहत असतील असे म्हटले. हार्दिकच्या वडिलांनी हार्दिक व कृणाल यांना क्रिकेटमध्ये कारकीर्द घडवता यावी यासाठी आपले मूळ शहर सोडून वडोदरा येथे बस्तान बसवले होते. हार्दिकच्या वडिलांचे मागील वर्षी निधन झाले आहे. इरफान पठाण याने देखील सुरुवातीच्या काळात हार्दिक व कृणाल यांना सहकार्य केले होते.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
सव्याज परतफेड! विराटच्या ऐतिहासिक खेळीने मेलबर्नमध्ये पाकिस्तान चारीमुंड्या चित; विश्वचषकात विजयी सुरुवात
मुस्कुराने की वजह तुम हो! पाकिस्तानच्या फलंदाजाला बाद करताच पंड्याने दिली स्माईल, व्हिडिओ व्हायरल 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---