भारतीय संघाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या सध्या संघासोबत न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील टी-20 मालिकेत हार्दिकला कर्णधाराची भूमिका सोपवली गेली आहे. हार्दिकसाठी ही टी-20 मालिका महत्वाची असून त्याआधी तो मोकळ्या वेळेचा पुरेपूर उपयोग करून घेताना दिसत आहे.
हार्दिक पंड्या (Hardik Pandya) त्याच्या हटके राहणीमानासाठी नेहमीच चर्चेत राहतो. चाहत्यांनाही त्याचे हे राहणीमान आवडते. मागच्या वर्षी टी-20 विश्वचषकात पूर्णपणे अपयशी ठरलेला हार्दिक पंड्या यावर्षीच्या विश्वचषकात मात्र जबरदस्त प्रदर्शन करताना दिसला. त्याने विश्वचषकात खेळलेल्या जबरदस्त प्रदर्शनानंतर तो न्यूझीलंड दौऱ्यात (India tour of New Zealand 2022) संघासाठी कर्णधाराची भूमिका पार पाडणार आहे. मात्र, त्याआधी हार्दिक स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करताना दिसला. त्याने स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून हे शर्टलेस फोटो शेअर केले आहेत. चाहत्यांकडून या पोस्टवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत.
https://www.instagram.com/p/Ck7ne-4rjam/?utm_source=ig_web_copy_link
न्यूझीलंड दौऱ्यात हार्दिक संघाचे नेतृत्व करणार असून त्याला भारताचा भविष्यातील कर्णधार म्हणूनही पाहिले जात आहे. अशात या दौऱ्यातील त्याच्या प्रदर्शनावर सर्वांचीच नजर असेल. भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि मुख्य फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) यांना न्यूझीलंड दौऱ्यात विश्रांती दिली गेली आहे. अशात 18 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेत हार्दिक संघाचे नेतृत्व करेल. तर 25 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत शिखर धवन (Shikhar Dhawan) कर्णधाराच्या भूमिकेत दिसणार आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ
हार्दिक पंड्या (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार / यष्टीरक्षक), शुबमन गिल, इशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.
न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवडलेला भारतीय संघ –
शिखर धवन (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार / यष्टीरक्षक), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), डब्ल्यू सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग , दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक. (Hardik Pandey’s new Instagram post before New Zealand tour is going viral)