भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली गुरुवारी (०७ जुलै) इंग्लंडविरुद्धचा पहिला टी२० सामना जिंकला. या सामना विजयात हार्दिक पंड्या याचा मोठा वाटा राहिला. त्याने बॅट आणि चेंडू दोन्हीने शानदार प्रदर्शन करत सर्वांचीच मने जिंकली. याबरोबरच त्याने अष्टपैलूंचा एक विलक्षण विक्रमही आपल्या नावावर केला आहे.
हार्दिकची वादळी खेळी
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारीत २० षटकात १९८ धावा केल्या. भारतीय संघाला ही मोठी धावसंख्या उभारून देण्यात स्टार क्रिकेटपटू हार्दिकचा (Hardik Pandya) मोठा वाटा राहिला. त्याने चहूबाजूंना फटकेबाजी करत ३३ चेंडूत तुफानी अर्धशतक ठोकले. १ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने त्याने ५१ धावांची खेळी केली. हे त्याचे आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील पहिलेच अर्धशतक होते.
गोलंदाजीतही दाखवला दम
फलंदाजीनंतर गोलंदाजीतही हार्दिकने आपला दम दाखवला. त्याने आपल्या कोट्यातील ४ षटके फेकताना ३३ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. त्याने आपल्या धारदार गोलंदाजीने इंग्लंडच्या फलंदाजी फळीचा खेळ उध्वस्त केला. सलामीवीर जेसन रॉय, डेविड मलान, लियाम लिविंगस्टोन आणि सॅम करन अशा फलंदाजांंना त्याने बाद (Hardik Pandya All round Performance) केले.
For his brilliant show with the bat and ball, @hardikpandya7 is adjudged Player of the Match as #TeamIndia win the first T20I by 50 runs.
Take a 1-0 lead in the series.
Scorecard – https://t.co/Xq3B0KTRD1 #ENGvIND pic.twitter.com/oEavD7COnZ
— BCCI (@BCCI) July 7, 2022
हार्दिकने रचलाय इतिहास
अशाप्रकारे एका टी२० सामन्यात अर्धशतक करणारा आणि ४ विकेट्स घेणारा हार्दिक जगातील १२वा व भारताचा पहिला (Hardik Pandya World Record) आणि एकमेव खेळाडू ठरला (Hardik Pandya World Record) आहे. त्याच्यापूर्वी माजी अष्टपैलू युवराज सिंगने अशीच कामगिरी केली होती. त्याने २००९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध अर्धशतक केले होते आणि ३ विकेट्स घेतल्या होत्या. परंतु आता हार्दिकने त्याचाही विक्रम मोडला आहे.
एकाच टी२० सामन्यात अर्धशतक आणि ३ किंवा जास्त विकेट्स घेणारे भारतीय
युवराज सिंग वि. श्रीलंका, २००९
६०* (२५), ३\२३
हार्दिक पंड्या वि. इंग्लंड, २०२२
५१ (३३), ४\३३
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
गोष्ट एका क्रिकेटरची भाग ५: मोठ्या भावाच्या जागी स्थान मिळालेला तो पुढे सर्वांचा दादा झाला
‘विराट ठग नाही, तो एक उत्कृष्ठ खेळाडू’, कोहलीला टार्गेट करणाऱ्या इंग्लिश मीडियावर दिग्गजाचा संताप
पूजा वस्त्राकरचा विश्वविक्रम, बनली ‘अशी’ कामगिरी करणारी जगातील पहिला महिला क्रिकेटपटू