अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवरील आयपीएल 2023चा 51वा सामना दोन व्यक्तींसाठी खूपच खास आहे. ते दोन व्यक्ती म्हणजेच हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या होय. रविवारी (दि. 7 मे) रंगलेल्या या सामन्यात गुजरात टायटन्स वि. लखनऊ सुपर जायंट्स हे संघ आमने-सामने आहेत. या सामन्यात गुजरातचे नेतृत्व हार्दिककडे आहे, तर लखनऊचा कर्णधार कृणाल आहे. अशात आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच दोन भाऊ कर्णधार म्हणून एकमेकांच्या आमने-सामने उभ ठाकले आहेत. या सामन्याच्या नाणेफेकीवेळी हार्दिक पंड्या याने मोठी प्रतिक्रिया दिली.
गुणतालिकेत अव्वलस्थानी असलेल्या गुजरात संघाचा सामना तिसऱ्या स्थानावरील लखनऊशी होत आहे. या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी गुजरात विरुद्ध लखनऊ संघात नाणेफेक झाली. यावेळी लखनऊचा कर्णधार कृणाल पंड्या (Captain Krunal Pandya) याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. नंतर समालोचकाने हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्याशी संवाद साधला.
काय म्हणाला हार्दिक?
यावेळी हार्दिक पंड्या म्हणाला की, “आम्ही प्रथम फलंदाजीच घेतली असती, त्यामुळे मला जे हवं होतं, ते मिळालं. हा खूपच भावूक करणारा दिवस आहे. आमच्या बाबांना खूप अभिमान वाटला असता. हे असं पहिल्यांदाच घडत आहे, त्यामुळे आमच्या कुटुंबाला अभिमान वाटत आहे. एक पंड्या आज नक्कीच जिंकेल.”
https://twitter.com/gujarat_titans/status/1655149249548656645
लखनऊविरुद्धच्या या सामन्यात गुजरात संघात एक बदल आहे. लिटन दास हा संघातून बाहेर पडला आहे. तो बांगलादेश संघाकडून आयर्लंडविरुद्ध भिडणार आहे. त्यामुळे त्याच्या जागी अल्झारी जोसेफ याचा संघात समावेश झाला आहे.
दुसरीकडे, लखनऊ संघातही एक बदल झाला आहे. नवीन उल हक संघातून बाहेर पडला असून त्याच्या जागी क्विंटन डी कॉक या विस्फोटक खेळाडूला संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे, डी कॉक हंगामातील त्याचा पहिलाच सामना खेळत आहे. (Hardik Pandya and Kunal Pandya face off in GT vs LSG match, Hardik’s big reaction)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
गुजरात टायटन्स-
वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुबमन गिल, हार्दिक पंड्या (कर्णधार), विजय शंकर, डेविड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी
लखनऊ सुपर जायंट्स-
क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), काईल मेयर्स, दीपक हुडा, कृणाल पंड्या (कर्णधार), मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन, स्वप्नील सिंग, यश ठाकूर, रवी बिश्नोई, मोहसिन खान, आवेश खान
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘रोहितने त्याचे नाव No Hit Man ठेवले पाहिजे’, शून्यावर बाद होताच मुंबईच्या कॅप्टनवर भडकला भारतीय दिग्गज
‘कसोटी क्रिकेटपासून चार हात लांबच राहा…’, मुंबईला नमवल्यानंतर धोनीचे पथिरानाविषयी खळबळजनक वक्तव्य