भारतीय अष्टपैलू हार्दिक पांड्या याने जड हृदयाने गुरुवारी (18 जुलै) त्याच्या घटस्फोटाची घोषणा केली. मे 2020मध्ये हार्दिकने सर्बियन मॉडेल नताशा स्टॅनकोविकसोबत लग्न केले होते. मात्र अवघ्या 4 वर्षांतच त्यांचा संसार मोडला. दोघांनीही संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला असल्याचे हार्दिकने त्याच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे सांगितले. तसेच घटस्फोटानंतर दोघे मिळून मुलगा अगस्त्यला सांभाळतील, असेही त्याने स्पष्ट केले. यानंतर हार्दिकला संपत्तीतील तब्बल 70 टक्के भाग नताशाला पोटगीत द्यावा लागेल, असे बोलले जात आहे.
हार्दिक आणि नताशामधील मतभेदाच्या बातम्या तेव्हा यायला सुरुवात झाली, जेव्हा नताशाने इंस्टाग्रामवरुन तिचे व हार्दिकचे फोटो हाइड केले. तसेच तिने इंस्टाग्राम अकाउंटवरुन पांड्याचे आडनाव हटवले. त्यानंतर ती एका अभिनेत्यासोबत फिरतानाही दिसली होती. याव्यतिरिक्त आयपीएल 2024 दरम्यान मुंबई इंडियन्सच्या नेतृत्त्वबदलामुळे आणि संघाच्या खराब प्रदर्शनामुळे हार्दिक प्रचंड ट्रोल झाला होता. या वाईट परिस्थितीतही नताशा त्याला पाठींबा देण्यासाठी आली नव्हती. शिवाय टी20 विश्वचषक विजयानंतरही नताशाने हार्दिकला शुभेच्छा दिल्या नव्हत्या. या सर्व घडामोडींमुळे दोघांमध्ये सर्वकाही अलबेल नसल्याच्या चर्चा होत्या.
या सर्व चर्चांवर आता पूर्णविराम लावत हार्दिकने नताशासोबत अधिकृतपणे घटस्फोट घेतला आहे. घटस्फोटानंतर हार्दिक पंड्याला त्याच्या कमाईतील 70 टक्के रक्कम नताशाला द्यावी लागू शकते. हार्दिककडे भरपूर संपत्ती असल्याचे समोर आले होते. हार्दिकने आतापर्यंत आयपीएलमधून 75 कोटी रुपये कमावल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर भारतीय संघाकडून त्याला दर वर्षी पाच कोटी रुपये मिळतात. त्याचबरोबर तो जेवढे सामने खेळतो, त्यासाठी त्याला वेगळे मानधनही बीसीसीआयकडून मिळते. हार्दिककडे मुंबईत 30 कोटींचं घर आहे, त्याचबरोबर त्याच्याकडे खास पेंट हाऊसही आहे. हार्दिककडे रोल्स रॉईस, मर्सिडीजसारख्या महागड्या गाड्याही आहेत. हार्दिकची एकूण संपत्ती ही 91 कोटी रुपयांची असल्याचे म्हटले जात आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार हार्दिक पंड्याला आपल्या संपत्तीमधील 70 टक्के वाटा हा नताशाला द्यावा लागू शकतो, असे म्हटले जात होते. हार्दिककडे सध्याच्या घडीला ९१ कोटी रुपयांची संपत्ती आहे, त्यामुळे हार्दिकला जवळपास 63 कोटी रुपये पोटगी द्यावी लागेल, असे आता म्हटले जात आहे. पण याबाबतची अधिकृत आकडेवारी अजून समोर आलेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
ईशान किशनच्या करिअरला ब्रेक? भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी आता एकच मार्ग
गाैतम गंभीरची गुगली! या खेळाडूच्या निवडीने केले सर्वांना आश्चर्यचकित
टीम इंडियाची घोषणा: गौतम गंभीरचा मास्टर प्लॅन? धोनीच्या विश्वासू खेळाडूला संघातून वगळलं!