---Advertisement---

दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडनं रचला इतिहास! 30 वर्षापूर्वीचा रेकाॅर्ड काढला मोडीत

England Cricket
---Advertisement---

सध्या नॉटिंगहॅममध्ये इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंड संघानं इतिहास रचला आहे. इंग्लंडनं या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सर्वात जलद 50 धावा ठोकल्या. इंग्लंडनं केवळ 4.2 षटकातं 50 धावा ठोकल्या आणि आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला.

तत्पूर्वी या सामन्यात वेस्ट इंडिजनं (West Indies) नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रत्युत्तरात इंग्लंडनं पहिल्याच षटकात जॅक क्रॉलीची (Zak Crawley) विकेट गमावली, परंतू त्यानंतर बेन डकेट (Ben Duckett) आणि ऑली पोप ( Ollie Pope) यांनी विस्फोटक फलंदाजी केली. पहिल्या षटकात इंग्लंडची धावसंख्या एका विकेटवर 4 धावा होती, पण पुढच्या तीन षटकांत इंग्लंडच्या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी केली.

वेस्ट इंडिजसाठी जेडेन सील्सनं दुसऱ्या षटकाची सुरुवात केली. या षटकात त्याला 19 धावा काढल्या. तर तिसऱ्या षटकात 12 धावा, चौथ्या षटकात 9 धावा झाल्या. अल्झारी जोसेफच्या (Alzarri Joseph) तिसऱ्या चेंडूवर इंग्लंडनं पाचव्या षटकातील दुसऱ्या चेंडूंवर 50 धावा करत इतिहास रचला.

आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये 4.2 षटकात 50 धावा करणं ही कसोटी क्रिकेटमधील कोणत्याही संघानं केलेली सर्वात जलद धावसंख्या आहे. इंग्लंडनं त्यांचंच रेकाॅर्ड मोडीत काढलं. त्यांनी याआधी 1994 मध्ये ओव्हलच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4.3 षटकात 50 धावा केल्या होत्या.

या सामन्यात बेन डकेटनं (Ben Duckett)  2015 नंतर आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक मारण्याचा विक्रम केला. डकेटनं अवघ्या 32 चेंडूत अर्धशतक झळकावले.

2015 नंतर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणारे खेळाडू

23 चेंडू – डेव्हिड वॉर्नर विरुद्ध पाकिस्तान, 2017
28 चेंडू – रिषभ पंत विरुद्ध श्रीलंका, 2022
30 चेंडू – जॉनी बेअरस्टो विरुद्ध न्यूझीलंड, 2022
31 चेंडू – शार्दुल ठाकूर विरुद्ध इंग्लंड, 2021
32 चेंडू – बेन डकेट विरुद्ध वेस्ट इंडिज, 2024

महत्त्वाच्या बातम्या-

ठरलं…!!! भारताचे दोन दिग्गज खेळणार श्रीलंकेविरुद्धची एकदिवसीय मालिका
एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान द्विशतक ठोकणारे टाॅप-5 खेळाडू! दोन भारतीय खेळाडूंचाही समावेश
व्हायचं होतं फलंदाज पण झाले मात्र गोलंदाज! या 2 भारतीय खेळाडूंची कहाणी खूपच रंजक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---