भारतीय क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. भारताला या दौऱ्यात तीन सामन्यांची एकदिवसीय आणि तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या या दोन्ही मालिकांमध्ये भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि दिग्गज विराट कोहली उपस्थित नसतील. हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात भारताला 18 नोव्हेंबरपासून टी-20 मालिका खेळायची आहे. पण त्याआधी कर्णधार आणि संघातील काही खेळाडू समुद्रकिनारी एन्जॉय करताना दिसत आहेत.
अष्टपैलू वॉशिंगटन सुंदर (Washington Sundar) याने स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये टी-20 मालिकेत कर्णधाराच्या भूमिकेत दिसणारा हार्दिक पंड्या (Hardik Pandya), वेगवान गोलंदाज उमरान मलिक (Umran Malik), श्रेयस अय्यर (Shreyas Iyer), अर्शदीप सिंग (Arshdeep Singh), आणि स्वतः वॉशिंगटन सुंदर दिसत आहेत. हे सर्वांना चाहेत या व्हिडिओत समुद्र किनारी शर्टलेस पाहून चांगलेच आनंदी दिसतात. व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असल्याचेही दिसते.
https://www.instagram.com/reel/ClAuvjVg20-/?utm_source=ig_web_copy_link
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिका शुक्रवार, 18 नोव्हेंबर रोजी वेलिंग्टनमध्ये सुरू होईल. मालिकेतील दुसरा सामना 20 नोव्हेंबर, तर तिसरा सामना 22 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. उभय संघांतील टी-20 मालिका संपल्यानंतर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाईल. एकदिवसीय मालिकेत शिखर धवन (Shikhar Dhawan) भारताचे नेतृत्व करताना दिसेल. युवा यष्टीरक्षक फलंदाज या दोन्ही मालिकांमध्ये उपकर्णधाराची भूमिका पार पाडताना दिसणार आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ
हार्दिक पंड्या (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार / यष्टीरक्षक), शुबमन गिल, इशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.
न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवडलेला भारतीय संघ –
शिखर धवन (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार / यष्टीरक्षक), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), डब्ल्यू सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग , दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक. (hardik pandya and other team players were seen shirtless on beach in new zealand)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 विश्वचषक 2024 बाबत कॅप्टन हार्दिकचे बडे बोल! म्हणाला, ‘रोडमॅप आता सुरू झाला असून अनेकांना….’
वनडे क्रिकेटमध्ये ‘नर्व्हस नाइंटी’चे शिकार होणाऱ्या अनलकी फलंदाजांची संपूर्ण यादी