---Advertisement---

सेमीफायनलमध्ये हारल्यानंतर विराट अन् पंड्याचं तुटलं हृदय! ‘हा’ फोटो तुम्हालाही करेल भावूक

On: शुक्रवार, नोव्हेंबर 11, 2022 12:04 AM
Virat-Kohli-And-Hardik-Pandya
---Advertisement---

गुरुवारी (दि. 10 नोव्हेंबर) टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाला इंग्लंड संघाने 10 विकेट्सने पराभूत केले. या पराभवानंतर भारताचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले. भारतीय खेळाडू या पराभवामुळे खूपच निराश असल्याचे दिसले. अशात सामन्यानंतरचे विराट कोहली आणि हार्दिक पंड्या यांचे फोटो व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून प्रत्येक भारतीय चाहता भावूक झाल्याशिवाय राहणार नाही.

इंग्लंडविरुद्ध पराभव होताच भारतीय खेळाडूंचे चेहरे निराश दिसले. भारतीय चाहत्यांना अपेक्षा होती की, 15 वर्षांनंतर भारतीय संघ टी20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावावर करेल. मात्र, त्यांना हा पराभव खूपच निराश करणारा ठरला. या सामन्यात विराट कोहली आणि हार्दिक पंड्या यांनी शानदार फटकेबाजी केली. मात्र, निराशाजनक पराभवानंतर हे दोन्ही खेळाडू भलतेच निराश दिसले.

https://twitter.com/AbhayYadav1340/status/1590702661002989568

यादरम्यानचा दोघांचाही फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत दिसते की, दोघांचे चेहरे उतरले आहेत. खरं तर, या सामन्यात विराटने अर्धशतक ठोकले होते. त्याने 40 चेंडूत 50 धावा चोपल्या होत्या. दुसरीकडे, पंड्यानेही विस्फोटक फलंदाजी करत 33 चेंडूत 63 धावा केल्या होत्या. या धावा करताना त्याने 4 चौकार आणि 5 षटकार मारले होते. या दोघांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने 6 विकेट्स गमावत 168 धावा चोपल्या होत्या.

इंग्लंडचा भारतावर विजय
यानंतर भारताच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंड संघाचे सलामीवीर जोस बटलर आणि ऍलेक्स हेल्स या जोडीने पहिल्या सहा षटकातच 63 धावा कुटल्या होत्या. भारताने ही जोडी तोडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, परंतु ते अपयशी ठरले. इंग्लंडने 16व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारत भारताच्या विश्वचषक विजयाच्या अपेक्षांवर पाणी फेरले. बटलरने 80, तर ऍलेक्सने 86 धावांचे योगदान दिले. या सामन्यात इंग्लंडच्या ऍलेक्स हेल्सला त्याच्या खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

आता इंग्लंड संघ 13 नोव्हेंबर रोजी मेलबर्न येथे टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा सामना करेल. (Hardik Pandya and Virat Kohli disappointed after india’s loss against england in T20 World Cup 2022 2nd Semi Final)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सेमीफायनलमध्ये फिफ्टी ठोकणारा पंड्या भारत हारल्यावर झाला भावूक; म्हणाला, ‘मी दु:खी आहे…’
‘या’ 5 चुका आधीच सुधारल्या असत्या, तर भारत पाकिस्तानविरूद्ध खेळला असता फायनल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---