हार्दिक पंड्या हा त्याच्या अष्टपैलू प्रदर्शनासाठी ओळखला जातो. भारताचा कट्टर प्रतिद्वंद्वी असलेल्या पाकिस्तान संघाविरुद्धही त्याने आपल्या अष्टपैलू प्रदर्शनाचा नमुना सादर केला. प्रथम धारदार गोलंदाजी करत त्याने पाकिस्तानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्यानंतर फलंदाजीतही त्याने वादळी खेळी करत संघाला 5 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवून दिला. या सामन्यातील शेवटच्या षटकात दोन्ही संघांच्या खेळाडूंवर भरपूर दबाव होता. या दबावाच्या परिस्थितीतही हार्दिकने दिलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरत आहे.
पाकिस्तानच्या 148 धावांच्या आव्हानाचा (Pakistan vs India) पाठलाग करताना भारतीय संघाला अपेक्षित सुरुवात मिळाली नव्हती. 89 धावांवर भारतीय संघाने 4 महत्त्वपूर्ण विकेट्स गमावल्या होत्या. शेवटच्या दोन षटकात भारतीय संघाला विजयासाठी 21 धावांची आवश्यकता होती. मात्र या षटकात 3 चौकार आल्याने 14 धावा जमा झाल्या होत्या. परिणामी विसाव्या षटकात विजयासाठी फक्त 7 धावांचे आव्हान होते.
मात्र शेवटच्या षटकात सामना आणखीनच रोमांचक झाला. कारण विसाव्या षटकातील पहिल्या चेंडूवर अष्टपैलू रविंद्र जडेजा बाद झाला होता. 29 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकार मारत 35 धावा करून जडेजाची विकेट गेली होती. त्यानंतर यष्टीरक्षक दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) खेळपट्टीवर आला होता. कार्तिकने षटकातील दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. त्यामुळे हार्दिक (Hardik Pandya) स्ट्राईकवर आला. मग हार्दिकने तिसरा चेंडू डॉट खेळला. परिणामी 3 चेंडूत 6 धावा असे समीकरण झाले.
Bas LIFE mein itna confidence chahiye, maza aajaye🕺🏻@hardikpandya7 pic.twitter.com/XxEhdJd2M4
— Ramesh Solanki (Modi Ka Parivar) 🇮🇳 (@Rajput_Ramesh) August 28, 2022
Ye chiller attitude 🤙before the six that made 🇮🇳 win tonight is… everything!!Respect to @hardikpandya7 training and confidence! #INDvsPAK https://t.co/q0ChEbM1OG
— Mukti Mohan (@thisIsMukti) August 28, 2022
या दबावाच्या परिस्थितीत भलेभले घामाघूम होतात. नॉन स्ट्राईकवर असलेल्या कार्तिकला कदाचित याचा दबाव आला असावा, असे हार्दिकला वाटले. म्हणून त्याने हा चेंडू खेळून झाल्यानंतर आपली मान हालवत कार्तिकला चिंतामुक्त राहण्याचा इशारा केला. हा प्रसंग कॅमेरात कैद झाला असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
#HardikBadhaai pic.twitter.com/e2DfhplbcF
— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) August 28, 2022
https://twitter.com/jiimhalpert/status/1563953199480213504?s=20&t=sPyKqoDReAT0GePGe7fmFQ
क्रिकेटप्रेमींना हार्दिकची ही स्टाईल खूपच भावत आहे. हार्दिकच्या आत्मविश्वासाठी (Hardik Pandya Confidence) चाहते त्याचे कौतुक करताना दिसत आहेत.
दरम्यान हार्दिकच्या प्रदर्शनावर नजर टाकायची झाल्यास, त्याने गोलंदाजी करताना 4 षटके टाकत 25 धावांवर 3 विकेट्स घेतल्या. त्यानंतर फलंदाजीत त्याने 17 चेंडूत नाबाद 33 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याच्या बॅटमधून 1 षटकार आणि 4 चौकार निघाले.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
INDvsPAK: मोठ्या पराभवानंतर पाकिस्तानी सुपरफॅनवर आली थेट अॅम्ब्युलन्स शोधण्याची वेळ
INDvsPAK: तेच मैदान, तेच विरोधक! चार वर्षापूर्वी स्ट्रेचरवर बाहेर गेलेल्या हार्दिकचे जबरदस्त पुनरागमन
नवरा भारताचा अन् पाकिस्तानची बायको, INDvsPAK सामन्यात झाली पंचाईत! फोटो तुफान व्हायरल