---Advertisement---

एक ही तो दिल है, कितनी बार जितोगे! हार्दिकने विरोधी संघाच्या फलंदाजाला भेट दिली स्वत:ची बॅट

On: सोमवार, जुलै 26, 2021 8:48 AM
---Advertisement---

भारत विरुद्ध श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ झाला आहे. या मालिकेतील पहिला टी-२० रविवारी (२५ जुलै) आर प्रेमदासा स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ३३ धावांनी विजय मिळवला आहे. दरम्यान हार्दिक पंड्या या सामन्यात पुन्हा एकदा साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. परंतु सामना झाल्यानंतर त्याने मन जिंकणारे कृत्य केले आहे.

पहिल्या टी-२० सामन्यात हार्दिक पंड्या अवघ्या १० धावा करू शकला. तसेच गोलंदाजी करताना देखील त्याला एक गडी बाद करण्यात यश आले आहे. सातत्याने चांगले प्रदर्शन करण्यात अपयशी ठरतत असल्यामुळे त्याच्यावर टीकेचा वर्षाव केला जात आहे. परंतु सामन्यादरम्यान त्याने असे काही केले आहे, ज्यामुळे त्याने चाहत्यांचे मन जिंकले आहे.

एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामधे हार्दिक पंड्या इशान किशनच्या हातून बॅट मागवताना दिसून येत आहे. ती बॅट काही वेळ पाहून झाल्यानंतर तो ती बॅट श्रीलंकेच्या चमिका करूनारत्नेला भेट म्हणून देतो. हे पाहून करुणारत्ने भलताच खुश होतो आणि बॅट हाती घेऊन शॅडो प्रॅक्टिस करू लागतो. यावेळी जवळच उभा असलेला सूर्यकुमार यादवही त्या बॅटची प्रशंसा करताना दिसतो.

विरोधी संघाच्या खेळाडूप्रती हार्दिकच्या मनात असलेली सद्भावना पाहून क्रिकेटप्रेमी प्रभावित झाले आहेत. अनेकांनी त्याची प्रशंसा केली आहे. (Hardik Pandya giving bat to chamika Karunaratne s spare bat watch video)

इतकेच नव्हे, सामना सुरू होण्यापूर्वी यजमान श्रीलंका संघाचे राष्ट्रगीत सुरू असतानादेखील हार्दिकने सर्वांचे लक्ष वेधले होते. तेव्हा तो श्रीलंकाचे राष्ट्रगीत गाताना दिसून आला होता. हे पाहून हार्दिकच्या चाहत्यांनी त्याचे तोंडभरून कौतुक केले आहे.

भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटक अखेर ५ गडी बाद १६४ धावा केल्या होत्या. यामध्ये सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ५० धावांचे योगदान दिले होते. तर कर्णधार शिखर धवनने ४६ आणि संजू सॅमसनने २७ धावांची खेळी केली. श्रीलंका संघाकडून गोलंदाजी करताना चमिरा आणि हसरंगा यांना प्रत्येकी २-२ गडी बाद करण्यात यश आले.

भारतीय संघाने दिलेल्या १६५ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंका संघाकडून असलंकाने सर्वाधिक ४४ धावांची खेळी केली. अविष्का फर्नांडोने २६ धावांचे योगदान दिले. भारतीय संघांकडून उपकर्णधार भुवनेश्वर कुमारने अप्रतिम गोलंदाजी करत श्रीलंकेच्या ४ फलंदाजांना माघारी पाठवले. श्रीलंका संघाचा डाव १८.३ षटकात १२६ धावांवर संपुष्टात आला होता. या सामन्यात भारतीय संघाने ३८ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Video: चमिराची चपळ गोलंदाजी; पहिलाच चेंडू असा टाकला की, शॉ भोपळाही न फोडता झेलबाद

श्रीलंकेविरुद्ध अर्धशतक करताच सूर्यकुमार यादवच्या नावावर झाला ‘मोठा’ विक्रम; गंभीर, रैनाही पडले मागे

हार्दिक पंड्या गात होता चक्क श्रीलंकन राष्ट्रगीत? व्हिडिओ झाला व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---