माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपल्या कार्यकाळात एक परंपरा सुरू केली होता ज्यामध्ये मालिका जिंकल्यानंतर तो ट्रॉफी संघातील सर्वात तरुण किंवा नवीन खेळाडूला द्यायचा. धोनीनंतर विराट कोहलीपासून रोहित शर्मापर्यंत प्रत्येक कर्णधाराने ती परंपरा पुढे चालवली. पण वेस्ट इंडिजविरुद्धची टी-२० मालिका जिंकल्यानंतर हार्दिक पंड्याने हा सराव मोडून काढत संघातील काही सपोर्टिंग स्टाफला ट्रॉफी दिली. विंडीज दौऱ्यावर निवडलेल्या टी-२० संघात एकही नवोदित किंवा यापूर्वी कधीही ट्रॉफी उंचावलेला खेळाडू नव्हता हेही यामागचे कारण असू शकते. रोहित शर्मा शेवटच्या टी-२०मध्ये खेळला नाही, त्यामुळे हार्दिक पंड्याकडे संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी आली.
टी-२० ट्रॉफी जिंकल्यानंतर हार्दिक पंड्या संघाजवळ पोहोचला आणि त्यानंतर त्याने आपल्या एका सपोर्ट स्टाफला संघाजवळ आणले. हार्दिकने त्याला ट्रॉफी दिली आणि संघासोबत फोटोसाठी पोज देण्यास सांगितले. मात्र, या सपोर्ट स्टाफचे नाव अद्याप समोर आलेले नाही.
Team India lift the trophy after their dominating win against West Indies! 🏆
Watch all the highlights from India tour of West Indies, only on #FanCode 👉 https://t.co/ntUHMGG8f4@BCCI @windiescricket#WIvIND #INDvsWIonFanCode #INDvsWI pic.twitter.com/YQuMp9oBWf
— FanCode (@FanCode) August 7, 2022
स्पर्धेबद्दल बोलायचे झाले तर भारताने पाचव्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजचा ८८ धावांनी पराभव करत मालिका ४-१ ने जिंकली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने ७ बाद १८८ धावा केल्या आणि त्यानंतर १५.४ षटकांत वेस्ट इंडिजला १०० धावांत गुंडाळले. वेस्ट इंडिजकडून शिमरॉन हेटमायरने सर्वाधिक ५६ धावांची खेळी केली. भारताकडून रवी बिश्नोईने २.४ षटकात १६ धावा देत ४ बळी घेतले. त्याचवेळी अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.
दौऱ्यातील शेवटच्या सामन्यात रोहित शर्माशिवाय सूर्यकुमार यादव, रिषभ पंत आणि भुवनेश्वर कुमार या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. आता हे सर्व खेळाडू आशिया कपमध्ये खेळताना दिसणार आहेत. विंडीज दौऱ्यानंतर, टीम इंडिया झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर जाईल जिथे ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे, परंतु वरिष्ठ खेळाडूंना या मालिकेत विश्रांती दिल्यामुळे अनेक युवा खेळाडूंना खेळण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
कपिल देव यांनी सांगितले त्यांच्या फिटनेसचे रहस्य, युवा खेळाडूंनाही दिल्या टिप्स
‘आम्हाला संघात हे बदल करावे लागतील’, अंतिम सामन्यात पराभवानंतर कर्णधार हरमनप्रीतचे मोठे विधान
‘टी२० विश्वचषकात पराभवानंतर टीम इंडियाने काय बदल केले?’ आता खुद्द कॅप्टन रोहितनेच केले स्पष्ट