सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy 2024) ही स्पर्धा खेळली जात आहे. त्यामध्ये भारताचे स्टार खेळाडू धुमाकूळ घालत आहेत. आता हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) बडोद्याकडून खेळताना एकाच षटकात 29 धावा करण्याचा पराक्रम केला आहे. खरे तर (27 नोव्हेंबर) रोजी इंदूरच्या होळकर स्टेडियमवर बडोदा आणि तामिळनाडू संघात रोमांचक सामना झाला, ज्यामध्ये बडोदाने 3 विकेट्सने विजय मिळवला. याच सामन्यात हार्दिकने केवळ 20 चेंडूत अर्धशतक ठोकले.
सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर तामिळनाडूने प्रथम खेळताना 221 धावांची मोठी मजल मारली होती. प्रत्युत्तरात बडोद्याची धावसंख्या 16व्या षटकात 6 गडी गमावून 156 धावांपर्यंत पोहोचली होती. दरम्यान, गुर्जपनीत सिंग 17व्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आला होता. त्याच्या षटकात हार्दिकने 4 षटकार 1 चौकारासह एकूण 29 धावा ठोकल्या.
बडोद्याला विजयासाठी शेवटच्या 4 षटकांत 66 धावा करायच्या होत्या, तर 17व्या षटकात हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) झंझावाती खेळीमुळे त्याच्या संघाला 18 चेंडूत 36 धावा करायच्या होत्या. 16व्या षटकाच्या अखेरीस हार्दिकने 10 चेंडूत 15 धावा केल्या होत्या. नंतर त्याने गुर्जपनीतच्या पहिल्या 3 चेंडूंवर षटकारांची हॅट्ट्रिक केली. चौथ्या प्रयत्नात गुर्जपनीतने नो-बॉल टाकला, तर हार्दिकने चौथ्या अधिकृत चेंडूवर पुन्हा षटकार ठोकला. हार्दिकने या षटकात पाचव्या चेंडूवर 1 चौकार आणि शेवटच्या चेंडूवर 1 धाव घेऊन एकूण 29 धावा केल्या. या षटकात नो बॉलसह एकूण 30 धावा आल्या.
गुर्जपनीत सिंग हा डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. आयपीएल 2025च्या मेगा लिलावादरम्यान तो प्रसिद्धीच्या झोतात आला. त्याला चेन्नई सुपर किंग्जने (CSK) 2.20 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. गुर्जपनीतने आपल्या टी20 कारकिर्दीत फक्त 2 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने फक्त 2 विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
सीएसकेचा मालक उघडपणे फिक्सिंग करायचा, आयपीएल संस्थापकांचा गंभीर आरोप!
IND vs AUS; विराटने कशामुळे झळकावले शानदार शतक? गावसकरांचे मोठे वक्तव्य
IPL 2025; सर्वात खतरनाक दिल्ली कॅपिटल्सची प्लेइंग इलेव्हन?