सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सोमवारी (११ एप्रिल) मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर खेळला गेलेला सामना अतिशय रोमांचक राहिला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरातकडून कर्णधार हार्दिक पंड्याने अर्धशतक केले. परंतु हैदराबादच्या कर्णधार केन विलियम्सनचे अर्धशतक त्याला पुरून उरले आणि हैदराबादने ८ विकेट्सने सामना जिंकत हंगामातील दुसरा विजय नोंदवला. दरम्यान अर्धशतक करूनही हार्दिकच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे.
हार्दिकने (Hardik Pandya) या सामन्यात आपल्या संघाची डगमगती गाडी रुळावर आणताना अतिशय संथ अर्धशतक (Hardik Pandya’s Slowest IPL Half Century) ठोकले आहे. हे त्याच्या आजवरच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वात संथ अर्धशतक ठरले आहे. हार्दिकने ४२ चेंडू खेळताना १ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने नाबाद ५० धावा फटकावल्या. हे त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वात हळूवार अर्धशतक आहे.
यापूर्वी हार्दिकने ४१ चेंडूंमध्ये सर्वात संथ अर्धशतक केले होते. २०१८ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध त्याने ही कामगिरी केली होती. मात्र आता त्याने स्वतचाच हा विक्रम मोडित काढला आहे.
हार्दिक पंड्याचे आयपीएलमधील सर्वात संथ अर्धशतक-
४२ चेंडू विरुद्ध हैदराबाद, २०२२
४१ चेंडू विरुद्ध आरसीबी, २०१८
२५ चेंडू विरुद्ध केकेआर, २०१५
२० चेंडू विरुद्ध राजस्थान, २०२०
१७ चेंडू विरुद्ध केकेआर, २०१९
हार्दिकचे हैदराबादविरुद्ध षटकारांचे शतक
असे असले तरीही, याच सामन्यादरम्यान हार्दिकने एक शानदार विक्रमही आपल्या नावावर केला आहे. अर्धशतक करताना हार्दिकच्या बॅटमधून एक शानदार षटकार (Hardik Pandya 100 Six In IPL) निघाले. हा षटकार त्याच्यासाठी विक्रमी ठरला आहे. त्याने या षटकारासह त्याचे आयपीएलमधील १०० षटकार पूर्ण केले आहेत. तसेच तो सर्वात कमी चेंडूंचा सामना करताना आयपीएलमध्ये सर्वात वेगवान १०० षटकार ठोकणारा पहिलाच भारतीय आणि जगातील तिसरा फलंदाज ठरला आहे. आयपीएलमधील १००० षटकार पूर्ण करण्यासाठी त्याने एकूण १०४६ चेंडूंचा सामना केला आहे.
हार्दिकपूर्वी आंद्रे रसेल आणि ख्रिस गेल यांनी सर्वात कमी चेंडू खेळताना हा पराक्रम केला होता. रसेलने केवळ ६५७ चेंडूंचा सामना करताना षटकारांचे हे खास शतक केले होते. तर गेलने यासाठी ९४३ चेंडू खेळले होते.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
वॉट अ कॅच! खतरनाक शुभमनला आऊट करण्यासाठी त्रिपाठीचा हवेत सूर मारत एकहाती झेल- Video
हैदराबादने रोखला गुजरातचा विजयरथ, ८ विकेट्सने जिंकली लढत; विलियम्सनची ‘कर्णधार’ खेळी
गुजरातविरुद्ध उमरानला नाही मिळाले अपेक्षित यश, तरीही भाऊची सोशल मीडियावर चर्चा; कारणही तसंच