---Advertisement---

हार्दिकवर धोनी आधीपासूनच मेहरबान, पहिल्या तीन सामन्यांमध्येच दिलेली ‘ही’ आनंदाची बातमी

On: मंगळवार, जून 7, 2022 8:42 AM
MS Dhoni and Hardik Pandya
---Advertisement---

अष्टपैलू हार्दिक पंड्या भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचा जवळचा मानला जातो. धोनीच्याच नेतृत्वात त्याने आंतरराष्ट्रीय  क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आता हार्दिकने धोनीशी संबंधित त्याच्या पदार्पणाचा एक खास किस्सा सांगितला आहे. धोनीने हार्दिकला त्याच्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये एक आनंदाची बातमी दिली होती.

हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आज जो काही आहे, त्याला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी एमएस धोनी (MS Dhoni) नक्कीच कारणीभूत आहे. धोनीने हार्दिकला त्याच्या पहिल्या तीन सामन्यांनंतर तो भारताच्या विश्वचषक संघात असणार आहे, अशी हमी दिली होती. एका पॉडकास्टवर बोलताना हार्दिक म्हणाला की, “जेव्हा मी भारतीय संघात सहभागी झालो, तेव्हा मी त्या सर्वांना पाहिले, ज्यांना मी लहानपणापासून पाहत मोठा झाला होतो. सुरेश रैना, हरभजन सिंग, युवराज सिंग, एमएस धोनी, विराट कोहली, आशिष नेहरा हे सर्व खेळाडू होते. मला वाटते की, मी पहिला खेळाडू असेल, ज्याने त्याच्या पहिल्या षटकात २१ धावा दिल्या असतील. मला वाटले ठीक आहे, हे माझे शेवटचे षटक असू शकते.”

“मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की, मी एमएस धोनीच्या नेतृत्वात खेळलो. त्याने माझ्यावर विश्वास दाखवला आणि इथपर्यंत पोहोचण्यासाठी मदत केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिसऱ्या सामन्यानंतर एमएस धोनीने मला सांगितले की, तू विश्वचषकासाठीच्या संघात असशील. माझ्यासाठी तिसऱ्या सामन्यात हे माहिती असणे की, मी विश्वचषक खेळणार आहे, ही मोठी गोष्ट होती. मी कोणत्याही सामन्यात फलंदाजी केली नव्हती, पण माही भाईने मला शब्द दिला की, तू स्वतःला सिद्ध केले आहे, पण होय हे माझ्यासाठी एका स्वप्नाप्रामाणे होते,” असे हार्दिक पुढे बोलताना म्हणाला.

हार्दिकच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्याचा विचार केला, तर तो ऑस्ट्रेलियासोबत खेळला होता. धोनीने या सामन्यात हार्दिकला गोलंदाजीसाठी चेंडू सोपवला होता. नवख्या खेळाडूंना गोलंदाजीची संधी देताना शक्यतो कर्णधार विचार करतात, पण धोनीला मात्र हार्दिकवर पूर्ण विश्वास असल्याचे पाहिले गेले होते. असे असले, तरी  हार्दिकने पहिल्याच षटकात २१ धावा खर्च केल्या. त्याने या सामन्यात एकूण ३७ धावा खर्च केल्या आणि २ विकेट्स नावावर केल्या. या तिन्ही सामन्यांमध्ये हार्दिकला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही, पण गोलंदाजीत मात्र त्याला तीन विकेट्स मिळाल्या होत्या.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

असं काय झालं की, पुनरागमनानंतर हार्दिक पंड्याने पहिल्याच सराव सत्राला मारली दांडी, जाणून घ्या कारण

वयाच्या ५५व्या वर्षी माजी श्रीलंकन कर्णधाराचा भाऊ जाणार खडी फोडायला, पाहा काय केलाय राडा

धक्कादायक! माजी भारतीय खेळाडूच्या वडिलांना अटक, कोर्टाचा एक दिवसीय रिमांडचा आदेश, काय आहे प्रकरण?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---