भारतीय क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 21 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. पण त्याआधीच भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताचा युवा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या पूर्ण तंदुरुस्त नसल्याने या मालिकेतून बाहेर पडला आहे.
हार्दिकच्या तंदुरुस्तीबद्दल बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रक जाहीर करत माहिती दिली आहे. बीसीसीआयने माहिती दिली की पंड्या लंडनला गेला होता. त्याच्याबरोबर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे(एनसीए) प्रमुख फिजिओ आशिष कौशिक हे देखील होते. लंडनमध्ये स्पायनल सर्जन डॉ. जेम्स एलिबोन यांनी हार्दिकची तपासणी केली.
तसेच बीसीसीआयने पुढे माहिती दिली की हार्दिक आता जो पर्यंत पूर्णपणे तंदुरुस्त होत नाही तोपर्यंत त्याची एनसीएमध्ये रिहॅबिलिटेशन प्रक्रिया (दुखापतीनंतरची प्रक्रिया) सुरु राहिल.
हार्दिक पाठीच्या दुखापतीमुळे सप्टेंबर 2019 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला मुकला आहे. त्याने भारताकडून शेवटचा टी20 सामना सप्टेंबर 2019 ला बंगळुरुमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला आहे.
हार्दिकला पाठीच्या दुखापतीसाठी मागीलवर्षी ऑक्टोबरमध्ये शस्त्रक्रियाही करावी लागली होती.
मंकडींगचा नियम काढण्याची मागणी करणाऱ्या अँडरसनची अश्विनने अशी घेतली फिरकी
वाचा????https://t.co/8HNegCO4l3????#म #मराठी #Cricket #Mankad @ashwinravi99— Maha Sports (@Maha_Sports) February 1, 2020
दोनही सामन्यात त्या क्रमांकाच्या ओव्हरने केला न्यूझीलंडचा घात
वाचा????https://t.co/8QmJMwwR2G????#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND #SuperOver— Maha Sports (@Maha_Sports) February 1, 2020






