भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या सध्या टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघासोबत आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि पांड्या यांच्यातील चांगले संबंध जगजाहीर आहेत. पंड्याने २०१६ मध्ये धोनीच्याच नेतृत्वात त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. अशात आता पंड्याने धोनी विषयी त्याच्या मनातील भावना व्यक्त केले आहेत.
तो म्हटला आहे की, धोनी त्याच्या भावासारखा आहे आणि तो प्रत्येक कठीण प्रसंगात त्याची आठवण काढतो. पंड्याच्या मते धोनी हा एकमात्र असा व्यक्ती आहे, जो त्याच्या भावना समजू शकतो.
ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना पंड्याने २०१९ मधील एक किस्सा सांगितला आहे, ज्यावेळी त्याच्यावर आणि केएल रहुलवर बंदी घालण्यात आली होती. नंतर याबाबत तपास केल्यावर त्यांच्यावरील बंदी उठवण्यात आली होती. या घटनेनंतर हार्दिकला न्यूझीलंड दौऱ्यासाठी निवडले गेले होते.
याबाबत सांगताना तो म्हणाला की, “धोनी हा असा व्यक्ती आहे, जो मला सुरुवातीपासूनच समजून घेत आला आहे. मी कसा व्यक्ती आहे, मला कोणत्या गोष्टी आवडत नाहीत. जेव्हा २०१९ मध्ये बंदी हटल्यानंतर मला न्यूझीलंडला पाठवला गेले, तर तेथे सुरुवातीला माझ्यासाठी हॉटेलमध्ये रूम नव्हती. नंतर मला फोन आला की, धोनीने माझ्यासाठी रूमचे नियोजन केले आहे. पुन्हा मला फोन आला की, इकडे ये. एमएसने सांगितले की, तो गादीवर नाही झोपत. तो खाली झोपेल आणि त्याच्या गादीवर मी. तो एक असा व्यक्ती आहे, जो नेहमी माझ्या मदतीसाठी तयार असतो.”
“तो मला खूप चांगल्या प्रकारे समजून घेतो. मी त्याच्या खूप जवळ आहे. तो एक खास व्यक्ती आहे, जो मला शांत करू शकतो. जेव्हा माझ्यासोबत एवढा सगळा विवाद झाला, तर त्याला वाटले की, मला मदतीची गरज आहे. त्यानंतर कारकिर्दीत त्याने माझी अनेकदा मदत केली. माझ्यासाठी माही माझ्या भावासारखा आहे. मी त्यासाठी त्याला सलाम करतो, कारण त्याने त्यावेळी माझी मदत केली, जेव्हा मला गरज होती,” असेही पंड्या म्हणाला आहे.
धोनीसोबत त्याची बॉन्डिंग जबरदस्त असल्याचे पंड्याने सांगितले आहे. तो पुढे म्हणाला, “माही भाई डार्लिंग सारखा आहे. मी त्याच्यासोबत अशा अनेक गोष्टी करू शकतो, ज्या दुसऱ्या कोणाबरोबर करू शकत नाही. मी त्याला एमएस धोनी सारखं ट्रीट करत नाही. तो माझ्या गोष्टींना चांगल्या प्रकारे समजून घेतो. त्याला वाटते की, जर मी काही करत आहे, तर नक्कीच काहीतरी विचार करून करत असणार.”
महत्त्वाच्या बातम्या –
विराट कोहली देणार दिवाळी साजरी करण्याच्या टिप्स, पण नेटकऱ्यांनी धरलं धारेवर
अजिंक्य कर्णधार तर पृथ्वी उपकर्णधार; ‘या’ स्पर्धेसाठी झाली मुंबईच्या संघाची घोषणा
पहिल्याच वर्ल्डकप सामन्यात चार चेंडूत चार बळी घेणाऱ्या कॅम्फरबद्दल ‘या’ गोष्ट माहितेय का?