---Advertisement---

टीम इंडियासाठी ही आहे सर्वात वाईट बातमी, हा मोठा खेळाडू होणार संघाबाहेर

On: मंगळवार, ऑक्टोबर 1, 2019 7:53 PM
---Advertisement---

भारताचा युवा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याला नोव्हेंबरमध्ये बांगलादेश विरुद्ध होणाऱ्या टी20 मालिकेला मुकावे लागण्याची दाट शक्यता आहे. त्याला मागील काही दिवसांपासून पाठीच्या दुखापतीचा त्रास होत आहे. या दुखापतीमुळे त्याला पुढील काही दिवस क्रिकेटपासून दूर रहावे लागण्याचीही शक्यता आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयच्या सुत्राने माहिती दिली की तो दुखापतीवर वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यासाठी लवकरच इंग्लंडला जाईल. त्याला मागीलवर्षी दुबईत झालेल्या एशिया कप स्पर्धेत पाठीची दुखापत झाली होती.

हार्दिकला या दुखापतीचा त्रास होत असल्याने भारतीय संघाला दुसरा मोठा धक्का बसला आहे. याआधी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या पाठीला स्ट्रेस फ्रॅक्चर झाल्याने तो उद्यापासून(2 ऑक्टोबर) सुरु होणाऱ्या दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे.

हार्दिकबद्दल बीसीसीआयच्या सुत्राने पीटीआयला सांगितले की ‘एशिया कपमध्ये झालेल्या दुखापतीनंतर हार्दिकवर उपचार केलेल्या डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी हार्दिक इंग्लंडला जाणार आहे.’

‘तो बांगलादेश विरुद्धची मालिका खेळणार नाही हे निश्चित आहे, पण तो आणखी किती काळ क्रिकेटपासून दूर राहिल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ते तो जेव्हा इंग्लंडवरुन परत येईल तेव्हा आपल्याला कळेल.’

तसेच जर हार्दिकला शस्त्रक्रियाला सामोरे जावे लागले तर त्याला जवळजवळ 5 महिन्यांसाठी क्रिकेटपासून दूर रहावे लागण्याची शक्यता आहे.

सुत्रानी पुढे सांगितले, ‘हार्दिकला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात फिट बसत नसल्याने संधी मिळाली नाही. पण त्याचा विजय हजारे ट्रॉफीसाठी कृणाल पंड्या नेतृत्व करत असलेल्या बडोदा संघातही समावेश नाही. सर्वांना आशा आहे की त्याला शस्त्रक्रियाला सामोरे जावे लागणार नाही. जर शस्त्रक्रिया झाली तर तो 2020 आयपीएलच्या आधी पुनरागमन करु शकणार नाही.’

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

जसप्रीत बुमराह उपचारासाठी जाणार ‘या’ देशात

हरभजनच्या त्या ट्विटवर युवराज सिंगने ‘हे’ उत्तर देत केले टीम इंडियाला ट्रोल

…म्हणून रोहित शर्मा आणि दक्षिण आफ्रिकेचे नाते आहे खास!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment