भारतीय क्रिकेट संघाचा प्रसिद्ध अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या ऑस्ट्रेलिया दौर्यावरून मायदेशी परतला आहे. त्यानंतर तो आता आपली पत्नी नताशा स्टॅन्कोव्हिक व मुलगा अगस्त्य यांच्यासोबत वेळ घालवत आहे. ऑस्ट्रेलियामध्ये वनडे आणि टी२० मालिका संपल्यानंतर पांड्या कसोटी मालिकेसाठी संघात नसल्यामुळे मायदेशी परतला होता. सध्या हार्दिक आणि नताशा हे सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलगा अगस्त्यच्या वेगवेगळ्या पोस्ट्स शेअर करत असतात. दरम्यान, हार्दिकने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात नताशा बाथ टबमध्ये अगस्त्यला अंघोळ घालताना दिसतेय.
नताशानेही शेअर केली स्टोरी
हार्दिकने आपल्या इंस्टाग्रामवरून शेअर केलेल्या व्हिडिओत दिसत आहे की, अगस्त्य बाथ टबमध्ये आहे, तर नताशा त्याला अंघोळ घालत आहे. हाच व्हिडिओ नताशाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवरही शेअर केला आहे. हार्दिक पंड्यासाठी २०२० हे वर्ष अगदी उत्तम गेले. याच वर्षी त्याने नताशाशी लग्न केले आणि दोघेही जुलैमध्ये पालक झाले. हार्दिक आयपीएलमध्ये भाग घेण्यासाठी ऑगस्टमध्ये युएईला रवाना झाला होता. जवळपास दोन महिने आयपीएलसाठी युएईमध्ये राहिल्यानंतर तिथूनच तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गेला होता.
https://www.instagram.com/p/CJDUgIdnhY1/?utm_source=ig_web_copy_link
https://www.instagram.com/p/CJDaK-OHGBH/?utm_source=ig_web_copy_link
मुलाला भेटण्यासाठी आतुर होता हार्दिक
अशा प्रकारे हार्दिक आपल्या मुलापासून सुमारे चार महिने दूर राहिला. टी२० मालिका संपल्यानंतर हार्दिकने मुलाला भेटायला आतुर असल्याचे म्हटले होते. ऑस्ट्रेलियावरून परतल्यानंतर हार्दिकने मुलगा अगस्त्य याच्या सोबतचे फोटो पोस्ट केले होते.
हार्दिकने ऑस्ट्रेलियात केली होती चमकदार कामगिरी
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताने टी२० मालिका २-१ अशा फरकाने जिंकली आणि त्यात हार्दिकचा मोठा वाटा होता. हार्दिकने वनडे मालिकेतही दोन ९० पेक्षा अधिक धावांच्या खेळी केल्या होत्या. हार्दिकला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी२० मालिकेत मालिकावीर म्हणून निवडण्यात आले होते. मात्र, हार्दिकने मनाचा मोठेपणा दाखवत, आपला पुरस्कार युवा वेगवान गोलंदाज टी नटराजनला दिला होता. हार्दिकचा समावेश भारताच्या कसोटी संघात नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताला कोहली आणि पुजाराचे अपयश भोवले, ऑस्ट्रेलियाच्या माजी फलंदाजचे मत
“विहारीला वरच्या फळीत संधी मिळावी, तर राहुलला…,” माजी भारतीय क्रिकेटरने मांडले मत
अफगाणिस्तान क्रिकेटसाठी खुशखबर; ‘या’ ठिकाणी बनणार नवे स्टेडियम






