नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे भारत विरुद्ध इंग्लंड दरम्यान झालेला पाचवा आणि अंतिम टी२० सामना भारताने ३६ धावांनी जिंकला. या सामन्यासह ३-२ च्या फरकाने भारताने टी२० मालिका खिशात घातली. दरम्यान भारतीय अष्टपैलू हार्दिक पंड्या याने जोरदार फटकेबाजी करत छोटेखानी पण महत्त्वपुर्ण खेळी केली. दरम्यान त्याने लागोपाठ २ गगनचुंबी षटकार मारले. त्याच्या या जबरदस्त शॉट्सला पाहून त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक भलतीच खुश झाल्याचे पाहायला मिळाले.
प्रथम फलंदाजी करताना भारताने अठराव्या षटकापर्यंत २ बाद १९३ धावा फलकावर नोंदवल्या होत्या. कर्णधार विराट कोहली आणि हार्दिकची जोडी मैदानावर टिकून होती. अखेरच्या २ षटकात अधिकाधिक धावा जोडण्याच्या प्रयत्नात हार्दिकने आक्रमक रवैय्या अंगिकारला. डावातील १० वे षटक टाकण्यासाठी आलेल्या ख्रिस जॉर्डनच्या पहिल्याच चेंडूवर डिप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खणखणीत षटकार मारला.
त्यानंतर पुढील दुसऱ्या चेंडूवरही हार्दिकने मिड विकेटवर उत्तुंग षटकार ठोकला. त्याच्या जबरा फलंदाजीला पाहून डगआउटमध्ये बसलेले भारतीय संघाचे कर्मचारी आणि खेळाडू जागचे उठून त्याचे टाळ्यांसह त्याचे कौतुक करू लागले. दुसरीकडे स्टेडियममध्ये उपस्थित असलेली नताशाही जागची उठली आणि मोठमोठ्याने टाळ्या वाजवू लागली.
तिच्या जल्लोषाने सामना दर्शकांचे लक्ष वेधले. अनेकांनी तिचा आनंद साजरा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
https://twitter.com/MahendraDada/status/1373291912958930948?s=20
हार्दिकने विराटसोबत सामन्याखेर नाबाद राहत संघाला २०० पार धावा उभारण्यात मोलाचा वाटा उचलला. त्याने १७ चेंडूत नाबाद ३९ धावांची खेळी केली. यात त्याच्या २ षटकार आणि ४ चौकारांचा समावेश होता.
महत्त्वाच्या बातम्या-
Video: निर्णायक सामना जिंकताच विराटचे सर्वप्रथम रोहितला आलिंगन, शुभेच्छा देत थोपटली पाठ
अन् अचानक वातावरण तापलं! वाद घालण्यासाठी कोहलीची बटलरच्या दिशेने धाव, पाहा पूर्ण प्रकरण
‘कॅप्टन’ कोहलीचा मोठेपणा! मालिका विजयानंतर ट्रॉफी सोपवली सुर्यकुमार आणि इशान किशनकडे, पाहा व्हिडिओ