आशिया चषक 2022 च्या भारत विरुद्ध पाकिस्तान या महत्त्वाच्या सामन्यात भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या हार्दिक पंड्याचे नाव सध्या भरपूर चर्चेत आहे. जगभरातील आजी-माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट तज्ज्ञांशिवाय चाहते सोशल मीडियावर त्याचे जोरदार कौतुक करत आहेत. हार्दिकने शानदार अष्टपैलू खेळ दाखवत भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माही हार्दिकचे कौतुक करताना दिसला. मात्र, आपल्या पदार्पणाच्या सामन्यात हार्दिक ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी चांगलेच धारेवर धरले होते.
हार्दिकने 2015 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टी20 पदार्पण केले होते. ऑस्ट्रेलियन डावाच्या आठव्या षटकात त्यावेळी कर्णधार असलेल्या एमएस धोनीने त्याच्याकडे चेंडू सोपवलेला. मात्र, ऍरॉन फिंचने एक षटकार व स्टीव्ह स्मिथने एक चौकार त्याला लगावलेला. तसेच हार्दिकने पाच वाईड चेंडू टाकलेले. तसेच दोन्ही फलंदाजांनी आणखी चार धावा घेत त्याच्या पहिल्या षटकातच 19 धावा वसूल केलेल्या.
पहिले षटक महागले ठरले तरी देखील, धोनीने त्याच्यावर विश्वास दाखवत त्याला आणखी दोन षटके गोलंदाजी दिली. त्याने देखील कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत दोन बळी मिळवले. हार्दिकने त्या सामन्यात 3 षटकात 37 धावा देत 2 बळी टिपलेले.
तेव्हापासून हार्दिक भारतीय टी20 संघाचा नियमित सदस्य आहे. मागील वर्षी युएईतच झालेल्या टी20 विश्वचषकात त्याला अपयश आले होते. गोलंदाजी तसेच फलंदाजीत तो आपले योगदान देऊ शकला नव्हता. त्यामुळे त्याच्यावर मोठी टीका झालेली. मात्र, त्यानंतर हार्दिक काही काळ क्रिकेट पासून विश्रांती घेतलेली. त्याने थेट आयपीएलमध्ये पुनरागमन करत गुजरात टायटन्स संघाला आपल्या नेतृत्वात विजय मिळवून दिला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: भज्जी शिकवू लागला श्रीसंतला गोल्फ; पाहा पुढे काय घडलं
टी-20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाची चिंता वाढली, दुखापतीमुळे महत्वाचा अष्टपैलू संघातून बाहेर
‘हार्दिक कर्णधाराला अनेक पर्याय देतो’ गुजरातच्या सहकाऱ्याने पंड्याबाबत केलंय खास विधान