भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना बुधवारी (दि. 22 मार्च) चेन्नई येथे रंगला. या सामन्यात भारतीय संघाचा दमदार अष्टपैलू हार्दिक पंड्या याने कौतुकास्पद कामगिरी केली. मैदानात गोलंदाजीला येताच पंड्या फलंदाजांवर तुटून पडला आणि अवघ्या तीनच षटकातच पाहुण्या संघाच्या तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. त्याने यावेळी ऑस्ट्रेलिया संघावर दबाव बनवण्याचा प्रयत्न केला. चला तर पंड्याने घेतलेल्या दोन विकेट्सबद्दल जाणून घेऊया…
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील तिसऱ्या वनडे सामन्यात स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी ऑस्ट्रेलियाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी ट्रेविस हेड आणि मिचेल मार्श फलंदाजीला उतरले होते. यादरम्यान हेड 33 धावांवर फलंदाजी करत असताना 11वे षटक हार्दिक पंड्या (Hardik Pandya) टाकण्यासाठी आला होता. यावेळी त्याच्या पाचव्या चेंडूवर हेडने फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण तो कुलदीप यादव याच्या हातून झेलबाद झाला.
.@hardikpandya7 picks up two quick wickets as Travis Head and Steve Smith depart.
Watch the two dismissals here 👇👇#INDvAUS @mastercardindia pic.twitter.com/65yyVrPR2f
— BCCI (@BCCI) March 22, 2023
यानंतर पंड्याने दुसऱ्या विकेटसाठी कर्णधार स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याची शिकार केली. हेडनंतर फलंदाजीला आलेल्या स्मिथकडून संघाला अपेक्षा होती, पण पंड्या त्याचे दुसरे षटक टाकण्यासाठी आला. त्याने डावातील 13वे षटक टाकताना दुसऱ्याच चेंडूवर स्मिथला यष्टीरक्षक केएल राहुल याच्या हातून शून्यावर झेलबाद केले.
Hardik Pandya picks up his second wicket as Steve Smith is caught behind for a duck.
Live – https://t.co/Be8688CLXC #INDvAUS @mastercardindia pic.twitter.com/AzfPyNhxtu
— BCCI (@BCCI) March 22, 2023
पंड्याने तिसरी विकेट तुफान फॉर्ममध्ये असलेल्या मिचेल मार्श (Mitchell Marsh) याची घेतली. मार्श धावफलक हलता ठेवण्याचे काम करत होता. मात्र, वैयक्तिक तिसरे आणि डावातील 15वे षटक टाकण्यासाठी आलेल्या पंड्याने त्याला तंबूत धाडलं. पंड्याने 15व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर मार्शला त्रिफळाचीत केले. यावेळी मार्श 47 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने 47 धावांवर खेळत होता.
From 68/0 to 85/3 👀
Hardik Pandya has dismissed Australia’s top three in less than four overs!#INDvAUS | 📝: https://t.co/1TO8TYwH93 pic.twitter.com/NmPgfhrrqc
— ICC (@ICC) March 22, 2023
विशेष म्हणजे, हार्दिक पंड्या याने या तिन्ही विकेट्स त्याने टाकलेल्या तिन्ही षटकात घेतल्या आहेत. अशाप्रकारे ऑस्ट्रेलिया संघाने 85 धावांवर तीन विकेट्स गमावल्या. (hardik pandya takes 3 wickets in just 3 overs agains austrlia 3rd test take a look)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: स्मृतीला गोलंदाजी करताना पाहिले का? हुबेहूब विराटसारखीच ऍक्शन, WPL मध्ये दिसले नवे रूप
वनडे विश्वचषक 2023चं वेळापत्रक आलं रे, ‘या’ दिवशी खेळला जाणार अंतिम सामना?