भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात खेळपट्टी गोलंदाजीसाटी अनुकूल पाहायला मिळाली. भारतीय गोलंदाजांनी अवघ्या 15 धावांवर न्यूझीलंड संघाच्या पाच विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज डिवॉन कॉनवे याला बाद करण्यासाठी अष्टपैलू हार्दिक पंड्या याने जबरदस्त चपळाई दाखवली. हार्दिकने टाकलेल्या चेंडूवर कॉनवेने त्याच्याच हातात विकेट गमावली. यासाठी सर्वत्र त्याचे कौतुक केले जात आहे.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेला न्यूझीलंड संघ अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही. मोहम्मद शमी (Mohammad Shami) याने पहिल्याच षटकात फिन एलन (Finn Allen) याच्या रूपात न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. यानंतर न्यूझीलंड संघाला एकप्रकारे गळती लागल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या पाच फलंदाजांपैकी एकही फलंदाज न्यूझीलंड संघासाठी दोन आकडी धावसंख्या करू शकला नाही. सलामीवीर जोडी फिन एलन आणि डिवॉन कॉनवे (Devon Conway) यांनी अनुक्रमे शून्य आणि 7 धावा केल्या.
न्यूझीलंडचे फलंदाज एकापाठोपाट विकेट्स गमावत असताना फिन एलन मात्र संयमी खेळ दाखवताना दिसला. मात्र, डावातील 10 व्या षटकात हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने त्याची विकेट अखेर घेतलीच. 10 व्या षटकातील चौथ्या चेंडूवर कॅनवे स्ट्राईकवर होता आणि त्याने हा चेंडूवर बचावातम्क पद्धतीने खेळला. पण तरीही हार्दिकने चपळाई दाखवत झेल पकडला आणि कॉनवेला विकेट गमवावी लागली. चेंडू कॅनवेच्या बॅटला लागून खेळपट्टीवर पडणारच होता, तितक्यात हार्दिकने हात मध्ये घातल्यामुळे कॉनवे झेलबाद झाला. हा झेल पकडल्यामुळे हार्दिकचे सर्वत्र कौतुक होत आहे.
https://twitter.com/parmar2602/status/1616725521576103937?s=20&t=t7aShp_HoCJqXXRCF0oGyQ
https://twitter.com/SharyOfficial/status/1616724895651479552?s=20&t=t7aShp_HoCJqXXRCF0oGyQ
दरम्यान, भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात मालिका जिंकण्याच्या विचारासह मैदानात उतरला. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने 12 धावांनी विजय मिळवला असून 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने विजय मिळवल्यानंतर संघ 2-0 अशी विजयी आघाडी घेईल आणि मालिका देखील नावावर करेल. (Hardik Pandya takes a brilliant catch off Devon Canaway watch Video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO | रोहित शर्मा बनला गजनी! नाणेफेक जिंकला पण नेमकी ‘ही’ गोष्टच विसरला
विराटच्या सहकाऱ्याची अचानक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, गरोदर पत्नीवर नेटकऱ्यांनी केल्या होत्या चुकीच्या कमेंट्स