---Advertisement---

आहा कडकच! बड्डे बॉय पंड्याने काढला विस्फोटक गुरबाजचा काटा, सीमारेषेवर शार्दुलचा अफलातून कॅच

On: बुधवार, ऑक्टोबर 11, 2023 3:30 PM
Hardik-Pandya-And-Shardul-Thakur
---Advertisement---

बुधवारी (दि. 11 ऑक्टोबर) वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 9वा सामना भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात खेळला जात आहे. दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडिअमवर रंगलेल्या या सामन्यात अफगाणिस्तान संघ फलंदाजी करत आहे. यादरम्यान 14 षटकांतच संघाच्या 3 विकेट्स पडल्या आहेत. यातील दुसरी भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याने घेतली. विशेष म्हणजे, पंड्या आज त्याचा 30वा वाढदिवस साजरा करत आहे.

कशी मिळाली विकेट?
अफगाणिस्तानकडून डावाची सुरुवात करण्यासाठी रहमानुल्लाह गुरबाज (Rahmanullah Gurbaz) आणि इब्राहिम जादरान मैदानावर उतरले होते. मात्र, सातव्या षटकातील चौथ्या चेंडूवर जसप्रीत बुमराह याने जादरानला वैयक्तिक 22 धावांवर केएल राहुलच्या हातून झेलबाद केले. त्यानंतर संघाला दुसरा झटका 13व्या षटकातील चौथ्या चेंडूवर बसला. हे षटक हार्दिक पंड्या (Hadik Pandya) टाकत होता.

https://twitter.com/mufaddal_vohra/status/1712039591648342270

शार्दुलचे यशस्वी प्रयत्न
पंड्याने चेंडू टाकताच फलंदाज गुरबाजने जोरदार फटका मारला. मात्र, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेजवळ शार्दुल ठाकूर क्षेत्ररक्षण करत होता. गुरबाजने मारलेला चेंडू षटकारासाठी जात होता, परंतु शार्दुलने चेंडू झेलला. यावेळी त्याने चेंडू झेलल्यानंतर त्याचा तोल जाऊन तो सीमारेषेच्या पलीकडे गेला, पण त्यापूर्वी त्याने चेंडू हवेत फेकला आणि षटकार जाण्यापासून वाचला. यावेळी त्याने पुन्हा मैदानात जाऊन हा झेल पूर्ण केला.

https://twitter.com/BrokenCricket/status/1712043345466601733

अशाप्रकारे अफगाणिस्तान संघाला 63 धावांवर दुसरी विकेट गमवावी लागली. गुरबाज यावेळी 28 चेंडूत फक्त 21 धावा करून बाद झाला. त्याच्या या खेळीत 1 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश होता. (Hardik Pandya takes wicket Good catch by Shardul Thakur near the boundary rope Afghanistan losses Rahmanullah Gurbaz)

स्पर्धेच्या नवव्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

अफगाणिस्तान
रहमानुल्लाह गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम जादरान, रहमत शाह, हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, अजमतुल्लाह ओमरजाई, राशिद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी

हेही वाचा-
रिझवानचा भीमपराक्रम! श्रीलंकेविरुद्धच्या तडाखेबंद शतकामुळे केला ‘हा’ विक्रम, 18 वर्षे जुना Record उद्ध्वस्त
दिल्लीत टीम इंडियापुढे अफगाणी आव्हान, पाहुण्यांनी जिंकला टॉस; रोहितसेनेतून स्टार खेळाडू बाहेर- Playing XI

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---