माऊंट मॉनगनुई| न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात आज(28 जानेवारी) पार पडलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात भारताने 7 विकेट्सने विजय मिळवत 5 सामन्यांच्या वनडे मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
या सामन्यातून भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याने बंदी उठल्यानंतर पुनरागमन केले आहे. त्याने पुनरागमन करताना चांगली कामगिरीही केली. त्याने या सामन्यात 2 विकेट्सही घेतल्या. तसेच त्याने क्षेत्ररक्षणातही चमक दाखवत न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनचा जबरदस्त झेल घेत सर्वांचे लक्ष वेधले.
त्याच्यावर मागील काही दिवसांपासून कॉफी विथ करन या शोमध्ये केलेल्या विवादात्मक विधानांमुळे टिका होत होती. यामुळे त्याच्यावर बीसीसीआयने बंदीही घातली होती. पण ही बंदी मागील आठवड्यात उठवण्यात आली.
त्यामुळे या प्रकरणानंतर हार्दिकने आज केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे त्याचे अनेकांनी कौतुक केले आहे. त्यानेही या सामन्यानंतर ‘थँक यू’ (आभार) अशी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने आजच्या सामन्यातील काही फोटोही शेअर केले आहेत.
Thank you 🙏 pic.twitter.com/rzIKQX7ELx
— hardik pandya (@hardikpandya7) January 28, 2019
हार्दिकच्या कामगिरीचे कर्णधार विराट कोहलीनेही सामन्यानंतर कौतुक केले आहे. “जर तुम्ही खेळाचा आदर करत नसाल, तर खेळही तुमचा आदर करणार नाही”, असे मत या सामन्यानंतर विराटने हार्दिक पंड्याबाबत मांडले.
तसेच विराट हार्दिकबद्दल म्हणाला, “तो एक असा खेळाडू आहे जो सामन्यात महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो. आजच्या सामन्यात त्याने खेळावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले होते. त्याच्या येण्याने संघाचा समतोल राखला गेला आहे.”
“जर अशा प्रकारची घटना होत असेल आणि त्यातून तुम्ही चांगल्याप्रकारे बाहेर येता. तेव्हा त्यातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळून जीवनात बदल घडून येतो. नंतर तुमची कारकिर्द उत्तम होते. इतिहासातही मी असे उदाहरणे बघितली आहेत”, असेही विराट म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या-
–९ वर्षानंतर रोहित शर्माच्या बाबतीत घडली ही नकोशी गोष्ट
–१४ वर्षांच्या कारकिर्दीत एमएस धोनीच्या बाबतीत असे तिसऱ्यांदाच घडले…
–भारताविरुद्धच्या उर्वरित वनडे सामन्यांसाठी न्यूझीलंड संघात या दोन खेळाडूंचे झाले पुनरागमन