भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी20 मालिकेतील दुसरा सामना गयाना येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाला 2 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. मालिकेतील हा भारताचाल सलग दुसरा पराभव ठरला. या मालिकेत भारताचे नेतृत्व हार्दिक पंड्या करत असून त्याने रविवारी जबरदस्त गोलंदाजी केली. रविचंद्रन अश्विन आणि जसप्रीत बुमराह या अनुभवी गोलंदाजांचे विक्रम हार्दिकच्या चेंडून मोडीत काढले आहेत.
टी-20 मालिकेतील या दुसऱ्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. निर्धारित 20 षटकांमध्ये 7 विकेट्स गमावून 152 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना विंडिजने 18.5 षटकात 8 विके्टस गमावून सामना जिंकला. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या विंडिज संघाची सुरवात खूपच खडतर झाली. भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने पहिल्याच षटकात वेस्ट इंडिजच्या पहिल्या दोन विकेट्स घेतल्या.
भारतीय संघाच्या 153 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिजची सुरवात खराब झाली. भारतीय संघाच्या वतीने या सामन्यात कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) ने स्वता गोलंदाजीची सुरुवात केली. त्याने पहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर सलामीवीर ब्रेंडन किंगला झेलबाद केले. यानंतर अवघ्या तीन चेंडूंत हार्दिकने जॉन्सन चार्ल्सला तंबूचा रस्ता दाखवला. हार्दिकने पहिल्याच षटकात विंडिज संघाला दोन मोठे झटके दिले. यानंतर त्याने वेस्ट इंडिजचा कर्णधार रोवमन पॉवेल याला बाद केले. हार्दिकने या सामन्यात 3 विकेट घेतल्या.
हार्दिककडून बुमराह आणि अश्विनचा विक्रम मोडीत
हार्दिकने सामन्यात 3 विकेट घेत जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) यांचा विक्रम मोडीत काढला. बुमराहने भारतासाठी टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 70 विकेट घेतल्या आहेत. तर, अश्विनने 65 सामन्यात 72 विकेट घेतल्या आहेत. आता हार्दिकने टी20 मध्ये 89 सामन्यात 73 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत.
युझवेंद्र चहल भारतीय संघाकडून टी20 प्रकारात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याने भारताकडून 76 सामने खेळत 95 विकेट्स घेतल्या आहेत. सोबतच भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार या यादित दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 86 सामन्यामध्ये 90 विकेट्स घेतल्या आहेत. (hardik pandya took 3 wicket surpassed jasprit bumrah and ravichandran ashwin in most t20 wickets record)
महत्वाच्या बातम्या-
कश्मीरच्या रोमानाच्या प्रेमात सरफराज क्लीन बोल्ड! लग्नासाठी मिळाली बहिणीची मदत
BREAKING! स्टार खेळाडूचा पत्ता टक, विश्वचषकासाठी 18 सदस्यीय ऑस्ट्रेलियन संघ घोषित