---Advertisement---

सुपरमॅन! हवेत सूर मारत पंड्याने एकहाती पकडला भन्नाट झेल, व्हिडिओ पाहून करालं वाहवा

---Advertisement---

भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्या याला विस्फोटक फलंदाजी, वेगवान गोलंदाजी आणि लक्षणीय क्षेत्ररक्षणासाठी ओळखले जाते. इंग्लंडविरुद्ध चालू असलेल्या कसोटी मालिकेसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली आहे. परंतु अद्याप त्याला एकाही सामन्यात अंतिम एकादशमध्ये संधी मिळालेली नाही. तरीही पंड्या नेट्समध्ये घाम गाळताना दिसत आहे. नुकताच त्याचा सरावादरम्यान अप्रतिम झेल पकडतानाचा व्हिडिओ पुढे आला आहे.

जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर अर्थातच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंड्या क्षेत्ररक्षणाचा सराव करताना दिसत आहे. दरम्यान एक चेंडू पकडण्यासाठी तो धाव घेतो आणि हवेत उंच उडी मारत एका हाताने चेंडू झेलतो. एका चाहत्याने पंड्याच्या या भन्नाट झेलचा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.

हार्दिकला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील मर्यादित षटकांच्या मालिका चालू असताना पाठीला दुखापत झाली होती. पुढे पाठीची सर्जरी करायची असल्याने त्याला कसोटी मालिकेतून बाहेर ठेवण्यात आले होते. परंतु तो दुखापतीतून सावरल्याने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याला जागा देण्यात आली आहे. परंतु अद्याप तो व्यवस्थित गोलंदाजी करू शकत नसल्याने त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये घेण्यात आले नाही.

https://twitter.com/Jitendar_Paviya/status/1365893880068014080?s=20

मात्र पंड्या सातत्याने आपल्या फिटनेसवर काम करत आहे. अशात येत्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात त्याला संधी मिळण्याची अपेक्षा आहे. कसोटी मालिकेतील पहिले ३ सामने संपल्यानंतर भारतीय संघाने इंग्लंडवर २-१ ची आघाडी मिळवली आहे. ४ मार्चपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यातही भारत विजयी घोडदौड चालू ठेवण्याचा प्रयत्न करेल. तर मालिकेत पिछाडीवर असलेला इंग्लंड संघही विजय मिळवण्यासाठी झगडताना दिसेल.

महत्त्वाच्या बातम्या-

सचिन तेंडुलकरच्या बॅटनेच आफ्रिदीने केला होता ‘तो’ जागतिक विक्रम; वाचा बर्थडे बाॅयच्या क्रिकेट प्रवासातील रंजक गोष्टी

त्याचं नशीबचं इतकं खराब होतं की सचिनबरोबर पदार्पण केलं, पण खेळला एकच कसोटी सामना

भारतातील प्रसिद्ध ६ क्रिकेट स्टेडियम, ज्यांना जिवीत व्यक्तींचे नाव देण्यात आले होते

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---