मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल 2024 ची सुरुवात चांगली झाली नाही. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघाला या हंगामातील पहिल्या 3 सामन्यांमध्ये सलग पराभवाचा सामना करावा लागला. परंतु त्यानंतर त्यांनी जोरदार पुनरागमन केलं. मुंबई इंडियन्सनं पहिले 3 सामने गमावल्यानंतर सलग 2 सामने जिंकले. दिल्ली कॅपिटल्सनंतर त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला. आता मुंबई इंडियन्स 5 सामन्यांत 4 गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. रविवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्ससमोर कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्जचं आव्हान असेल.
दरम्यान, मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्या आणि त्याचा मुलगा अगस्त्य दिसत आहे. व्हिडिओमध्ये हार्दिक आणि अगस्त्य मस्तीच्या मूडमध्ये खेळताना दिसत आहेत. मुंबई इंडियन्सच्या टीमनं त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सोशल मीडिया यूजर्स यावर सतत कमेंट करून आपला फीडबॅक देत आहेत. तुम्ही हा व्हिडिओ येथे पाहू शकता.
Cutest video you’ll see today 🥹🫶#MumbaiMeriJaan #MumbaiIndians | @hardikpandya7 pic.twitter.com/JLKh6tyquY
— Mumbai Indians (@mipaltan) April 13, 2024
शेवटच्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 7 विकेटनं पराभव केला. अशाप्रकारे हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघानं या मोसमातील दुसरा विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं 20 षटकांत 8 बाद 196 धावा केल्या. प्रत्युत्तरात, मुंबई इंडियन्सनं अवघ्या 15.3 षटकांत हे लक्ष्य गाठलं.
मुंबई इंडियन्सकडून ईशान किशननं 34 चेंडूत सर्वाधिक 69 धावा केल्या. तर सूर्यकुमार यादवनं 19 चेंडूत झटपट 52 धावा ठोकल्या. रोहित शर्मानं 24 चेंडूत 38 धावांचं योगदान दिलं. संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या 6 चेंडूत 21 धावा करून नाबाद माघारी परतला. मुंबईकडून जसप्रीत बुमराहनं शानदार गोलंदाजी केली. त्यानं 4 षटकांत 21 धावा देत 5 बळी घेतले.
महत्त्वाच्या बातम्या –
6 चेंडूत 6 षटकार! नेपाळच्या क्रिकेटपटूनं केला कहर, युवराज सिंगच्या विक्रमाची बरोबरी
ना विराट, ना रोहित….ट्रेंट बोल्ट म्हणाला, ‘हा’ भारतीय फलंदाज माझा आवडता