---Advertisement---

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान नताशाने सोडले हार्दिक पांड्याचे घर? मुलासोबत कायमची माहेरी परतणार?

On: बुधवार, जुलै 17, 2024 6:26 PM
natasha, hardik
---Advertisement---

27 जुलैपासून सुरू होणाऱ्या श्रीलंका विरुद्ध भारत संघातील 3 सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी हार्दिक पांड्या ऐवजी सूर्यकुमार यादव याची कर्णधारपदी निवड होण्याची शक्यता आहे. टी20 विश्वचषकात भारतीय संघाचा उपकर्णधार असूनही हार्दिककडे भावी कर्णधार म्हणून पाहिले जात नसल्याने अष्टपैलू खेळाडूसाठी हा मोठा धक्का असेल. एकीकडे भारतीय क्रिकेट संघातून हार्दिकसाठी चांगल्या बातम्या येत नसताना दुसरीकडे त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही वादळ आल्याचे समजत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून हार्दिक आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक हे वेगळे झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. यादरम्यान आता नताशा तिचा मुलगा अगस्त्य पांड्याला घेऊन कायमची माहेरी परतली असल्याची माहिती पुढे आली आहे.

हार्दिक आणि सर्बियन मॉडेल नताशा यांच्यात सर्वकाही अलबेल नसल्याची चर्चा आहे. नताशाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन हार्दिकचे आडनाव हटवले आहे. तसेच ती टी20 विश्वचषक आणि आयपीएल 2024 दरम्यान हार्दिकला पाठींबा देतानाही दिसली नव्हती. या कालावधीत ती सातत्याने सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट करतानाही दिसत आहे. त्यामुळे हार्दिक आणि नताशाचा घटस्फोट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अशातच नताशा आता मुलगा अगस्त्यासोबत मुंबई विमानतळावर दिसली आहे. सेलेब्स पापाराझी व्हायरल भयानी यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नताशा तिचा मुलगा आणि केअरटेकरसोबत दिसत आहे. नताशा कारमधून खाली उतरते आणि नंतर कारमधून दोन मोठ्या बॅग बाहेर काढते आणि मुलगा अगस्त्यासोबत जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तसेच तिने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये सामानाचा फोटो शेअर करताना ‘आता घरी परतण्याची वेळ आली आहे’, असे कॅप्शनही टाकले होते. त्यामुळे नताशा कायमची तिच्या माहेरी अर्थातच सर्बियाला तर परत जात नाहीये ना? अशी शंका चाहत्यांच्या मनात उपस्थित होऊ लागला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

कर्णधारपद तर फक्त ट्रेलर, पाहा पुढे आणखी काय काय होणार.., गौतम गंभीरने 2023 मध्येच दिलेला इशारा
रोहितला ऐकावा लागला प्रशिक्षक गंभीरचा आदेश! वनडे मालिकेतून पुनरागमन करण्याची शक्यता
श्रीलंका दौऱ्याआधीच भारत-पाकिस्तान आमने-सामने…! पाहा कधी होणार सामना?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---