यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकावर (ICC T20 World Cup) भारतानं नाव कोरले. त्यानंतर झिब्वाब्वेविरुद्ध असलेल्या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेवर भारतानं 4-1 असा विजय मिळवला. परंतू आता भारतीय संघ 3 सामन्यांची टी20 मालिका आणि 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी श्रीलंका दौऱ्यावर असणार आहे. यादरम्यान हार्दिक पांड्या श्रीलंकेविरुद्ध टी20 मालिकेत भारताची धुरा सांभाळेल. अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना सांगितले की, हार्दिक पांड्या (Hardik Pandya) भारतीय टी20 संघाचा उपकर्णधार होता, तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि श्रीलंकेविरुद्ध 3 सामन्यांच्या टी20 मालिकेसाठीही उपलब्ध आहे, त्यामुळे तो कर्णधार असेल. कारण टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्माने (Rohit Sharma) टी20 क्रिकेटला अलविदा केले.
भारत विरुद्ध श्रीलंका 3 सामन्यांची टी20 मालिका (27 ते 30 जुलै) दरम्यान पल्लेकेले येथे खेळली जाणार आहे. तर एकदिवसीय सामने (2 ते 7 ऑगस्ट) दरम्यान कोलंबोमध्ये खेळवले जाणार आहेत. येत्या काही दिवसांत टी20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी संघाची घोषणा केली जाईल. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) श्रीलंकेविरुद्ध टी20 मालिका खेळणार आहे. परंतू, तो श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध नसणार आहे.
एकदिवसीय मालिकेबाबत एका अधिकाऱ्याने सांगितले की, हार्दिकने वैयक्तिक कारणांमुळे ब्रेक मागितला आहे आणि त्याची माहिती नियमित कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) दिली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळल्यास सर्व स्टार क्रिकेटपटूंना देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागेल. तर यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना सूट देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आंद्रे रसलची एक चेंडू आणि ट्रेव्हिस हेडच्या बॅटचे दोन तुकडे, बॅट्समनचे रियाक्शन पाहण्यासारखे!
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत भारतासाठी ओपनिंग कोण करणार? हे 4 दावेदार रेसमध्ये
“रोहित शर्मा खूश नव्हता…”, आयपीएलमध्ये कर्णधारपदाच्या वादावरून दिग्गज गोलंदाजाचा मोठा दावा