भारतीय क्रिकेट संघाने अलीकडेच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर 4 सामन्यांची टी20I मालिका 3-1 ने जिंकली. या दौऱ्यात हार्दिक पांड्याही टीम इंडियाचा भाग होता. आता टीम इंडिया बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. पण हार्दिक पांड्या कसोटी संघाचा भाग नाही. अशा परिस्थितीत तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये हात आजमावताना दिसणार आहे. हार्दिक 23 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहे. त्याचा भाऊ कृणाल पांड्याच्या नेतृत्वाखालील बडोदा संघाचा तो भाग असेल.
जेद्दाहमध्ये आयपीएल 2025 मेगा लिलाव सुरू होण्याच्या एक दिवस आधी दोन्ही पांड्या बंधू मैदानात उतरतील. क्रुणालच्या नेतृत्वाखाली, बडोद्याने 2023-24 सय्यद मुश्ताक अली ट्राॅफी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. ज्यात त्यांना मोहालीमध्ये पंजाबकडून पराभव पत्करावा लागला. हार्दिकचे देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन संघासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे. हार्दिक शेवटचा रणजी ट्रॉफी 2018-19 मध्ये बडोद्याकडून खेळला होता. तो अखेरचा जानेवारी 2016 मध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळला होता. जेव्हा तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही सामना खेळला नव्हता.
HARDIK PANDYA WILL PLAY IN SYED MUSHTAQ ALI FOR BARODA 🔥
– Hardik will be playing under his brother, Krunal Pandya. [Sahil Malhotra from TOI] pic.twitter.com/3XIqplStrV
— Johns. (@CricCrazyJohns) November 19, 2024
गेल्या महिन्यात हार्दिकला मुंबई इंडियन्सने कायम ठेवले असून तो त्यांचा कर्णधार राहील. दरम्यान, क्रुणालला लखनऊ सुपरजायंट्सने रिलीज केले आहे. त्यामुळे तो मेगा लिलावाचा भाग असेल. बडोद्याने देशांतर्गत हंगामात दमदार सुरुवात केली असून रणजी ट्रॉफीच्या पहिल्या टप्प्यात 27 गुणांसह अ गटात अव्वल स्थान पटकावले आहे. हार्दिक पांड्या आणि क्रुणाल पांड्या हे बऱ्याच दिवसांपासून एकत्र खेळलेले नाहीत. दोन्ही खेळाडू मुंबई इंडियन्समध्ये अनेक वर्षे एकत्र खेळले, पण नंतर दोघेही वेगवेगळ्या फ्रँचायझींमध्ये गेले. मात्र, गुजरात टायटन्समध्ये 2 हंगाम घालवल्यानंतर हार्दिक मुंबई इंडियन्समध्ये परतला.
हेही वाचा-
IND VS AUS; माजी क्रिकेटपटूने निवडली पर्थ कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन!
पैशांमुळे दिल्ली कॅपिटल्सने रिषभ पंतला रिटेन केले नाही? यष्टीरक्षकानेच सांगितले पडद्यामागचे सत्य!
BGT; “विराट कोहलीला एकटे सोडा कारण…” माजी दिग्गजाचा ऑस्ट्रेलियाला इशारा