---Advertisement---

हार्दिकच्या मुलाखतीदरम्यान ‘पापा’ म्हणत छोट्या अगस्त्यने घेतली सरप्राईज एन्ट्री, पाहा बाप-लेकाचा गोड व्हिडिओ

On: सोमवार, ऑक्टोबर 18, 2021 5:35 PM
---Advertisement---

संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे रविवारपासून (१७ ऑक्टोबर) टी२० विश्वचषकाला सुरुवात झाली आहे. या विश्वचषकासाठी अनेक संघांचे फोटो शूट आणि खेळाडूंच्या मुलाखती सध्या सुरु आहेत. दरम्यान, असाच हार्दिक पंड्याच्या मुलाखतीदरम्यानच्या एका गोड क्षणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

झाले असे की, भारताचा अष्टपैलू हार्दिक टी२० विश्वचषकासाठी मुलाखत देत होता. पण, याचवेळी अचानक त्याचा दीडवर्षीय मुलगा अगस्त्य तिथे येतो. या घटनेचा व्हिडिओ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओला त्यांनी कॅप्शन दिले आहे की ‘वडील हार्दिक पंड्याला जेव्हा त्याच्या मुलाखतीदरम्यान सप्राईज देण्यासाठी एक पाहुणा येतो, तो गोड क्षण.’

या व्हिडिओमध्ये दिसते की हार्दिक मुलाखत देत आहे. त्याच्या आजूबाजूला कॅमेरा आणि लाईट्स आहेत. तसेच शूट करणारे लोक आहेत. याचवेळी ‘पापा’ असं म्हणत छोटा अगस्त्य हार्दिकच्या जवळ जातो. यावेळी हार्दिक त्याला सांगतो की माझं काम संपवून येतो. या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून अनेकांना हा व्हिडिओ पसंत पडत आहे.

https://twitter.com/BCCI/status/1450024852769984513

हार्दिकसमोर स्वत:ला सिद्ध करण्याचं आव्हान
हार्दिक सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. २ वर्षांपूर्वी त्याच्या पाठीवर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर तो सातत्याने संघर्ष करताना दिसत आहे. तसेच गोलंदाजी करतानाही तो खूप कमीवेळा दिसला आहे. त्यामुळे त्याची कामगिरी फारशी प्रभावित करणारी झाली नसल्याने त्याला टीकेला सामोरे जावे लागत आहे.

असे असले तरी, त्याच्यावरील विश्वास बीसीसीआयने कायम ठेवताना त्याला टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान दिले आहे. त्यामुळे हार्दिकसमोर आता स्वत:ला सिद्ध करण्याचं आव्हान आहे.

भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध
भारताचा टी२० विश्वचषकासाठी सुपर १२ फेरीत थेट प्रवेश झालेला आहे. त्यामुळे भारतीय संघ सुपर १२ फेरीपासून टी२० विश्वचषकातील आपल्या अभियानाची सुरुवात करेल. भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानविरुद्ध २४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यानंतर भारताला न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि पहिल्या फेरीतून पात्र ठरणाऱ्या २ संघांची दोन हात करायचे आहेत.

सुपर १२ फेरीनंतर उपांत्य फेरी आणि अंतिम सामना होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘टी२० विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये पोहचणार नाही पाकिस्तान संघ’, माजी क्रिकेटरचा घरचा आहेर

टी२० विश्वचषकाची पहिली लढत सुरू होण्यापूर्वी श्रीलंकेसाठी दुख:द बातमी, दिग्गज कर्णधाराचे निधन

द्रविड मुख्य प्रशिक्षक झाल्यावर एनसीएचा प्रमुख कोण? ‘या’ माजी खेळाडूचा जबाबदारी स्वीकारण्यासाठी नकार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---